जुगार खेळणाऱ्या आठजणांसह साडेपाच हजाराचे जुगार साहित्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:41 AM2021-02-21T04:41:43+5:302021-02-21T04:41:43+5:30
पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख ...
पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल काझी, पोलीस नाईक पवार, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख हे १९ फेब्रुवारी रोजी दु, ४.१५ च्या सुमारास सांगोला शहर हद्दीतील वंदे मातरम चौक ते चिंचोली रोडवर पेट्रोलिंग करत होते. यावेळी बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार चिंचोली रोडवरील भोसलेवस्ती येथील पत्राच्या अडोशालगत छापा टाकला असता काही इसम जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी देविदास माणिकराव फुलमाळे, बाळु भीमराव चव्हाण व अक्षय गौतम खंडागळे (रा. संजयनगर), जितेंद्र विठ्ठल चंदनशिवे (रा. भीमनगर), भिवा पांडुरंग गावडे (रा. धनगर गल्ली), राजेंद्र अशोक कोकरे (रा. एखतपूर रोड), रविराज दिलीप मस्के (रा. मस्के कॉलनी, सांगोला) व अन्य एक अशा ८ जणांना पकडून ताब्यात घेतले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल धनंजय इरकर यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.