कत्तलीसाठी बांधून ठेवलेली पाच जनावरे केली मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:14+5:302021-04-10T04:22:14+5:30
बार्शी : बार्शी शहरात गडेगावजवळ ४२२ वसाहतीच्या ठिकाणी कत्तलीसाठी आणून बांधून पाच जनावरे शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन ...
बार्शी : बार्शी शहरात गडेगावजवळ ४२२ वसाहतीच्या ठिकाणी कत्तलीसाठी आणून बांधून पाच जनावरे शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणी एकाला अटक केली असून, या जनावरांची एका गोशाळेत रवानगी केली.
ही कारवाई शुक्रवारी सकाळी झाली. याबाबत प्राणिमित्र धन्यकुमार पटवा यांनी तक्रार देताच पोलिसांनी आरोपी शकूर नजीर सौदागर व इम्तियाज नजीर सौदागर (रा.गाडेगाव रोड, बार्शी) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी इम्तियाज सौदागर यास अटक केली, तर शकूर याने पलायन केल्याचे पोलिसांनी सांगितले.
एका अपुऱ्या जागेत कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती प्राणिसंरक्षक धनयकुमार पटवा यांना समजली. त्यांनी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांना जनावरांची माहिती दिली. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर घोंगडे, महेश जऱ्हाड, हवालदार सविता देशमुख यांच्या पथकाने धाड टाकली, तेव्हा जनावरे आढळली. ही जनावरे सोडवून ती अलीपूर येथील नवकार गोशाळेत पाठविली. अधिक तपास पोलीस नायक श्रीहरी घोडके करत आहेत.