टेंभुर्णीतील पाच ५ धनुर्धरांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:32+5:302021-02-11T04:24:32+5:30

समीक्षा देशमुख, गाथा खडके, रेश्मा लोकरे, निशांत क्षीरसागर, अथर्व दौंड अशी त्यांची नावे आहेत. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान ...

Five archers from Tembhurni selected for the national competition | टेंभुर्णीतील पाच ५ धनुर्धरांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

टेंभुर्णीतील पाच ५ धनुर्धरांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Next

समीक्षा देशमुख, गाथा खडके, रेश्मा लोकरे, निशांत क्षीरसागर, अथर्व दौंड अशी त्यांची नावे आहेत. २५ ते २८ फेब्रुवारी दरम्यान अमृतसर पंजाब येथे राष्ट्रीय स्पर्धेत वरील सर्व खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. ७ फेब्रुवारीला वारणानगरच्या वाय. सी. काॅलेजच्या इनडोअर स्टेडियममध्ये राज्यस्तरीय स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत राज्यातील २५० धनुर्धरांनी सहभाग नोंदवला होता. दहा वर्षाखालील मुलींच्या इंडियन राऊंड प्रकारात समीक्षा देशमुखने सिंगल स्पाॅटमध्ये ब्रांझ, फाईव्ह स्पाॅटमध्ये सुवर्ण, वैयक्तिक व सांघिकमध्ये दोन सुवर्ण पदकाची कमाई केली. तर याच गटात गाथा खडके हिने सिंगल स्पाॅटमध्ये रौप्य, फाईव्ह स्पाॅटमध्ये रौप्य तर वैयक्तिक व सांघिक सुवर्ण अशी चार पदके पटकावत राज्यात दुसरा क्रमांक तर याच गटात रेश्मा लोकरेने सिंगल स्पॉट मध्ये सुवर्ण, फाईव्ह स्पाॅटमध्ये कांस्य, वैयक्तिक कांस्य व सांघिक सुवर्ण अशी चार पदके पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला.

दहा वर्ष मुलांच्या वयोगटात इंडियन राऊंड प्रकारात तीन कांस्य व सांघिक प्रथम क्रमांक पटकावित राज्यात तृतीय मिळवला आहे. १४ वर्ष वयोगटात इंडियन राऊंड प्रकारात निशांत क्षीरसागरने सिंगल स्पाॅटमध्ये कांस्य, फाईव्ह स्पाॅटमध्ये रौप्य तर वैयक्तिक रौप्य व सांघिकमध्ये सुवर्ण अशी चार पदके पटकावत राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. रिकर्व्ह राऊंड प्रकारात शिवराज देशमुख याने सहभाग नोंदवला. वरील सर्व धनुर्धर टेंभुर्णी येथील चॅम्पियन्स अकॅडमीत सराव करत आहेत. या सर्वांना प्रशिक्षक प्रा. रमेश शिराट यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी धनुर्धरांचा डॉ. आनंदराव खडके, कृषिधिकारी आनंदराव ढवळे, जवळगे, शिंदे, क्षीरसागर, लोकरे, दौंड यांनी सत्कार केला.

फोटो

१०मोडिनंब०१

ओळी

टेंभुर्णी येथे पार पडलेल्या फिल्ड आर्चरी स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसह प्रशिक्षक.

सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत जानवी, उदयराजे, आशितोष यांना सुवर्णपदक

मोडनिंब : शेटफळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत मोडनिंब येथील जानवी खोटे, उदयराजे ढेकळे, आशितोष शिंदे यांनी सुवर्णपदक पटकाविले. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ९५ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. तसेच सान्वी यादव, साक्षी माघाडे, मनीष ढेकळे, अर्जुन ढेकळे, समर्थ घोडके, रियाज मुलाणी यांनी सिल्वर मेडल पटकाविले. त्यांची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांना डॉ. सुहास खडके, इकबाल शेख, भीमराव बाळगे, श्रीकांत पुजारी, शुभम पुरवत, प्रशिक्षक शंकर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.

फोटो

०३मोडनिंब क्रीडा

ओळी

शेटफळ येथे झालेल्या जिल्हास्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक.

Web Title: Five archers from Tembhurni selected for the national competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.