उजनीच्या साठ्यात पाच टक्क्यांनी वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:27 AM2021-09-12T04:27:03+5:302021-09-12T04:27:03+5:30
गेल्या आठवड्यात ६२ टक्क्यावरन ६० टक्क्यावर गेलेली उजनी धरणाची पाणी पातळी पाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, ...
गेल्या आठवड्यात ६२ टक्क्यावरन ६० टक्क्यावर गेलेली उजनी धरणाची पाणी पातळी पाच दिवसात पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे.
दरम्यान, कालव्याचे पाणी बंद केल्याने आता टक्केवारीत वाढ होताना दिसून येत आहे. अजूनही उजनी धरण १०० टक्के भरण्यासाठी ३५ टक्के पाणी वाढ होणे गरजेचे आहे. सद्यपरिस्थितीत उजनीतून येणारा विसर्ग पाहता उजनी ७० टक्क्यापर्यंत जाईल.
----
गतवर्षीची टक्केवारी १०९ टक्के
गेल्या वर्षी आजच्या दिवशी उजनीची टक्केवारी १०९ टक्के होती. उजनीची पाणीपातळी ४९५.१८५ मीटर आहे तर एकूण पाणीसाठा ९८.८४ टीएमसी आहे. उपयुक्त पाणीसाठा ३५ टीएमसी आहे. तर टक्केवारी ६५.५० टक्के आहे. सीना माढा उपसा ७४ क्यूसेक, दहीगाव उपसा ८४ क्यूसेक, बोगदा १५० क्यूसेक विसर्ग सुरूच आहे.
----