विहिपच्या नेत्याच्या कोठडीत पाच दिवसाची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:10+5:302021-07-24T04:15:10+5:30
बार्शी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर साडेतीन कोटींचा दस्त केल्याप्रकरणी अटक केलेले सतीश श्रीमंत आरगडे यांचा जामीन संपताच पुन्हा ...
बार्शी : बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीर साडेतीन कोटींचा दस्त केल्याप्रकरणी अटक केलेले सतीश श्रीमंत आरगडे यांचा जामीन संपताच पुन्हा पाच दिवसाची पोलीस कोठडीत वाढ केली आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणी फसवणूक झाल्याप्रकरणी अजिंक्य श्रीकांत पिसे यांनी शहर पोलिसात तक्रार देताच विहिंपचे पुणे विभागाचे मंत्री सतीश श्रीमंत आरगडे यांच्यासह पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. यातील तिघांचा जामीन नामंजूर केला आहे. फरार असलेले सतीश आरगडे यांना पोलिसानी १४ जुलै रोजी पंढरपूर येथे अटक केल्यानंतर त्यांना २२ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ती संपल्याने पुन्हा न्यायालयात न्या. आर. एस. धडके यांच्यासमोर उभे केले असता, न्यायालयाने त्यांची कोठडी २६ जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. यावेळी सरकार पक्षातर्फे एफ. एम. शेख, फिर्यादीतर्फे ॲड. सोहम मनगिरे व ॲड. आय. के. शेख हे काम पाहत आहेत. याचा तपास सपोनि अमोल ननवरे हे करीत आहेत.
---