मोडनिंबमध्ये आजपासून पाच दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:47+5:302021-04-28T04:23:47+5:30
मोडनिंब : सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असूून ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ...
मोडनिंब : सध्या सोलापूर जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असूून ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक होत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सोमवारी ग्रामस्तरीय कोरोना कृती समिती आयोजित बैठकीमध्ये जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला.
बुधवार, २८ एप्रिल ते रविवार २ मेपर्यंत हा जनता कर्फ्यू राबविण्यात येणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनही तयारीला लागले आहेत. सध्या मोडनिंब परिसर आणि भोवतालच्या खेड्यांमध्ये अनेक रुग्ण बाधित आढळून येत आहेत. काही रुग्णांचा मुक्त वावर होताना आढळून आले आहे. गावात बँक, किराणा, दुकान, भाजी मंडई अशा ठिकाणी सात दिवसांत गर्दी करून खरेदी केली. या गावातील पोलीस पाटलांनी या पॉझिटिव्ह रुग्णांवर किमान दहा दिवस तरी लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला असून तशी मागणी ग्रामस्तरीय कोरोना कृती समितीने पोलीस प्रशासनाकडे मागणी केली आहे.