पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 10:58 AM2019-11-08T10:58:54+5:302019-11-08T11:00:29+5:30

पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक 

five devotees dead in accident after tempo rams into tractor trolly | पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू

पंढरपूरला निघालेल्या टेम्पोचा अपघात; 5 वारकऱ्यांचा मृत्यू

Next

सांगोला: भरधाव पिकअपची ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक बसून झालेल्या भीषण अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. जखमीपैंकी चौघांवर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहेत तर दोघांना किरकोळ मार लागला आहे. हा भीषण अपघात आज शुक्रवार पहाटे 5 च्या सुमारास सांगोला - पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ शब्बीर मुलाणी यांच्या वस्ती समोर घडला. 

चालक यल्लाप्पा देवाप्पा पाटील (वय 37 रा.हंगरगा ता.जि.बेळगावी), कृष्णा वामन कणबरकर (वय 42), महादेव मल्लाप्पा कणबरकर (वय 45), लक्ष्मण परशुराम आंबेवडीकर (वय 45), अरुण दत्तात्रेय मूतभेकर (वय 37) सर्वजण रा. मंडोळी ता. जि. बेळगावी असे ठार झालेल्या भाविकांची नावे आहेत. तर परशुराम गणपत दळवी वय 32 रा. मंडोळी, गणपत यल्लाप्पा दळवी वय 70, तमान्ना नारायण साळवी वय 50 , वैजिनाथ मारुती कनबरकर वय 45 सर्वजण रा.मंडोळी , गुंडू विठ्ठल तरळे वय 70 रा.मन्नूर, दिलीप मारूती शेरेकर वय 25 रा.बसीरकट्टी ता.जि.बेळगावी अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.

बेळगावीमधील वारकरी पिकअपमधून गुरूवारी रात्री साडेदहाच्या सुमारास कार्तिकी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र विठ्ठलच्या देवदर्शनासाठी निघाले होते. प्रवासादरम्यान चालक यल्लापा पाटील वगळता सर्वजण पिकअपच्या पाठीमागे हौद्यात बसले होते. वाटेत चालकासह सर्वानी मिळून मिरजच्या बाहेर चहा घेतला आणि पुढील प्रवासासाठी निघाले. त्यांची पिकअप सांगोला मार्गे पेढरपूरकडे जात होती. तर पंढरपूरकडून एम.एच.13 ए.एस.0992 हा ट्रॅक्टर दोन ट्रॉलीमध्ये विटा भरून सांगोल्याच्या दिशेने निघाला होता. यावेळी दोन्ही वाहने मांजरी गावाजवळ शब्बीर मुलाणी यांच्या वस्तीसमोर आली असता भरधाव पिकअपने ट्रॅक्टर ट्रॉलीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला.
 

Web Title: five devotees dead in accident after tempo rams into tractor trolly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.