आणखी पाच आरोपींना अटक
By admin | Published: May 6, 2014 05:57 PM2014-05-06T17:57:39+5:302014-05-06T17:57:39+5:30
वैराग : येथील वीटभट्टी मालक विठ्ठल उर्फ इर्याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे.
वैराग : येथील वीटभट्टी मालक विठ्ठल उर्फ इर्याप्पा मारुती पवार यांच्या खून प्रकरणातील आणखीन पाच आरोपींना पकडण्यात गुन्हा अन्वेषण पोलीस पथकाला यश आले आहे. आतापर्यंत २१ पैकी १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. २६ एप्रिल रोजी सकाळी वीटभट्टी मालक विठ्ठल पवार यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणी २० आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. सर्व आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी संतापलेल्या नागरिकांकडून जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. यापूर्वी फरार आरोपींपैकी नऊ आरोपींना पकडण्यात आले होते. रविवार चार मे रोजी सुभाष भीमा पवार यास तर पाच मे रोजी राजेंद्र सुभाष पवार, अनिल बाबू पवार, बाबू भीमा पवार, सतीश अशोक पवार (सर्व रा. इंदिरानगर, वैराग) या पाच आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे सपोनि बाळकृष्ण जाधव व सपोनि राजेंद्र टाकणे यांनी सांगितले. यापूर्वी २९ एप्रिल रोजी शिवाजी पवार, सुनील पवार व बबलू पवार तर ३० रोजी सागर पवार, शशिकांत धोंडे व आरोपींना मदत केल्याप्रकरणी ज्ञानेश्वर लावंड यास अटक करण्यात आली. १ मे रोजी संतोष पवार व तीन मे रोजी सागर धुले, पिनू देवकर अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. २१ पैकी आतापर्यंत १४ आरोपींना अटक करण्यात आली असून, अद्यापि सात आरोपी फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. या खूनप्रकरणी पोलीस अधीक्षक मकरंद रानडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिदास पवार, लक्ष ठेवून आहेत. (वार्ताहर)