वाघोलीत आठ दिवसांत पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:37+5:302021-05-12T04:22:37+5:30
मृत हा कोरोनाने मृत झाला नाही तर तो इतर आजाराने मृत झाला असल्याचे उत्तर ऐकायला मिळते. या आठवड्यात गावातील ...
मृत हा कोरोनाने मृत झाला नाही तर तो इतर आजाराने मृत झाला असल्याचे उत्तर ऐकायला मिळते. या आठवड्यात गावातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. महिनाभरात आठ जणांचा आकडा आहे. वाढत्या मृत्यू संख्येमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीमार्फत वेळोवेळी नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन केले जात आहे. मोठ्या दवाखान्यात गेल्यावर ऑनलाइन प्रणालीने मृताची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रास प्राप्त होत असते. परंतु मृत व्यक्ती किरकोळ दवाखान्यात गेल्याने त्याची योग्य माहिती आरोग्य विभागाला मिळत नाही. परिणामी कोरोना चाचण्या होताना दिसत नाहीत.
---
गावातील वाढती मृत्यूची संख्या पाहता आम्ही कोरोना दक्षता समितीमार्फत मृतांच्या घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यासाठी विनंती करीत आहोत. आरोग्य विभागाने रॅपीड किटने चाचण्या कराव्या. गावातील नागरिकांनी कोरोना चाचणी केल्यास रुग्णांचा आकडा समोर येईल. वेळेवर उपचार होण्यास मदत होईल.
-उर्मिला वाघमारे, सरपंच ग्रामपंचायत वाघोली-वाघोलीवाडी