पोहताना चुकून पाय लागला म्हणून पाचजणांनी केली मुलाची धुलाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:26 PM2023-03-27T21:26:40+5:302023-03-27T21:26:46+5:30
स्विमिंग टँकमध्ये पोहताना चुकून पाय लागला म्हणून चिडून पाचजणांनी मिळून मुलाची टँकमधून बाहेर आल्यानंतर धुलाई केली.
सोलापूर :
स्विमिंग टँकमध्ये पोहताना चुकून पाय लागला म्हणून चिडून पाचजणांनी मिळून मुलाची टँकमधून बाहेर आल्यानंतर धुलाई केली. प्रथमेश भारत ताटे (वय- १७, रा. भवानी पेठ, घोंगडे वस्ती सोलापूर) असं जखमी मुुलाचं नाव आहे. शहरातील मार्कंडेय तलाव येथे सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.यातील जखमी प्रथमेश हा दुपारी साडेचारच्या सुमारास नेहमीप्रमाणे अशोक चौकातील मार्कंडेय तलाव येथे पोहण्यासाठी गेला. चुकून त्याचा पाय पोहणाऱ्या एकाला लागला. त्याने चुकून झाल्याची कबुली दिली तरीही चिडलेल्या पाचजणांनी तो तलावातून बाहेर आल्यावर हाताने,पायाने त्याची धुलाई केली. यात प्रथमेश याच्या छातीला, पोटाला, पाठीला मुका मार लागला. यानंतर जखमीचा मित्र हरीष जाधव याने त्याला सोमवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.