्रजखमीस पाहावयास गेलेल्या पाच जणांना जबर मारहाण कुर्डूवाडीत संघर्ष; एकाला अटक; ११ जणांवर गुन्हा
By admin | Published: May 5, 2014 08:16 PM2014-05-05T20:16:04+5:302014-05-07T00:30:27+5:30
कुर्डूवाडी : भांडणात जखमी झालेल्यास पाहावयास ग्रामीण रुग्णालय येथे निघालेल्यांवर तलवारी व लोखंडी पाईपने मारहाण करुन ५ जणांना जखमी केले. ही घटना दि. ५ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास जुने पंचायत समिती कार्यालय, कुर्डूवाडी येथे घडली. यापैकी तिघांना सोलापूर येथे हलविण्यात आले आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

अनिल अशोक लंगडे यास मारहाण झाली होती. त्याला पाहण्यासाठी सारंग अर्जुन गवळी, योगेश सुरेश शिंदे, अजय बाळासाहेब गवळी व अनिल अशोक लंगडे (सर्व रा. कुर्डूवाडी) हे मोटरसायकलीवर चालले असता श्रीकांत सुभाष पाटील, अर्जुन यशवंत रजपूत, उमेश हरी पाटील, ईशात आबुताली कुरेशी, रोहित लक्ष्मण परबत, सुनील माणिक जाधव, दिगंबर पोपट चौधरी, राजेंद्र कृष्णपाल वाल्मीकी, पंकज हिरालाल शहा, बालाजी उर्फ स्वप्निल अशोक पाटील, शिवराज सुभाष पाटील (सर्व रा. कुर्डूवाडी) यांनी मोटरसायकलीवर येऊन बेकायदेशीररित्या मंडळी जमवून शिवीगाळ व दमदाटी केली. यातील योगेश शिंदे व अजय गवळी यांना कोयत्याने, तलवारीने व लाकडी दांडक्याने डोकीत, हातावर, पायावर मारुन गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद सारंग अर्जुन गवळी याने कुर्डूवाडी पोलिसांत दिली.
या फिर्यादीवरून ११ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी सोनवणे हे करीत आहेत. आरोपी श्रीकांत पाटील याला कुर्डूवाडी पोलिसांनी अटकही केली आहे.