मटका प्रकरणातील नगरसेवक सुनील कामाठीसह पाचजण दोन वर्षांसाठी तडीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:39 PM2021-01-23T12:39:43+5:302021-01-23T12:39:48+5:30
सोलापूर शहर पोलिस दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढला आदेश
सोलापूर : मटका प्रकरणातील मुख्य आरोपी भाजप नगरसेवक सुनील दशरथ कामाठी (वय ४५, रा. न्यू पाच्छा पेठ, खड्डा तालीम) याच्यासह पाच जणांना सोलापूर शहर, जिल्हा, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व उस्मानाबाद जिल्हा येथून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी काढला.
आरोपी कामाठी यांच्यावर सोलापुरात मटका चालवत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणात कामाठी जे सध्या जामिनावर बाहेर आहेत. या मटका प्रकरणातील कामाठी यांचे साथीदार ईस्माईल बाबू मुच्छाले (वय ३८, रा. मुस्लीम पाच्छा पेठ, जिंदाशा मदार चौक), शंकर चंद्रकांत धोत्रे (वय २३, रा. भगवान नगर झोपडपट्टी), नवनाथ भीमशा मंगासले (वय ३४, रा. मुस्लीम पाच्छा पेठ), हुसेन सैपनसाब शेख (वय ३०, रा. मुस्लीम पाच्छा पेठ) यांनाही दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले आहे.