सोलापुरात पाच ठिकाणच्या मतदान यंत्रात बिघाड
By Appasaheb.patil | Published: April 18, 2019 07:56 AM2019-04-18T07:56:23+5:302019-04-18T08:08:05+5:30
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा अधिकार
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी आज मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला, मात्र मतदान यंत्रात बिघाड झाल्याने सोलापूर लोकसभा मतदार संघातील पाच मतदान केंद्रावर उशिराने मतदान प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे सुरुवातीच्या काळात मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव, आचेगाव, सलगर तर सोलापूर शहरातील कुमठा नाका परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावरील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने मतदानास विलंब झाला.
सुशीलकुमार शिंदे यांनी केले मतदान
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या कुटुंबियासमवेत विजापूर रोडवरील जागृती मंदिर प्रशालेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी उज्ज्वलाताई शिंदे मुलगी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करा असे आव्हान आमदार प्रणिती शिंदे यांनी केले.