कुगाव येथे पाच वाळूमाफिया ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:20 AM2021-03-07T04:20:42+5:302021-03-07T04:20:42+5:30
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्यामसुंदर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, कुगाव येथे उजनी जलाशयात दोन यांत्रिक फायबर बोटीच्या ...
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन श्यामसुंदर घुगे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे, कुगाव येथे उजनी जलाशयात दोन यांत्रिक फायबर बोटीच्या साहाय्याने वाळूचोरी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ५ रोजी पहाटे २ वाजता तेथे छापा टाकला असता, नदीतील वाळू बेकायदेशीर उपसा करताना आढळून आले. त्यांच्याकडे १२ लाखांच्या दोन बोटी सापडल्या. १ लाख २० हजार रुपयांची १२ ब्रास वाळू सापडली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव यांनी या बोटींचा व वाळूचा पंचनामा करून वाळूसह बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या आहेत.
याप्रकरणी मफजूल शेख, महेबूब शेख, रफिकहूल शेख, माबूद शेख (सर्व रा. अकुलबना, झारखंड), तसेच पांडुरंग प्रल्हाद मोरे (रा. चिखलठाण) व दुसऱ्या बोटीचे मालक हनुमंत रेडके (रा. कालठण नं. १, ता. इंदापूर) यांच्यावर वाळूचोरी व पर्यावरण संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील जाधव हे करत आहेत.
फोटो
०६करमाळा-क्राइम
ओळी : कुगाव, ता. करमाळा येथे वाळूच्या फायबर बोटी पाण्यात बुडवून नष्ट केल्या.