गत पंचवार्षिकचे पाच सरपंच पुन्हा विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:24+5:302021-01-23T04:22:24+5:30
सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील निवडणुका झालेल्या २४ ग्रामपंचायतींपैकी केवळ पाच मावळते सरपंच पुन्हा विजयी झाले तर तिघांना पराभव पत्करावा ...
सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील निवडणुका झालेल्या २४ ग्रामपंचायतींपैकी केवळ पाच मावळते
सरपंच पुन्हा विजयी झाले तर तिघांना पराभव पत्करावा लागला. मात्र १६ ग्रामपंचायतीचे सरपंच निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेच नाहीत.
उत्तर सोलापूर तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मावळत्या पंचायत कार्यकारिणीतील नऊ सरपंचांनी निवडणूक लढवली. त्यामध्ये भागाईवाडीच्या कविता घोडके- पाटील, बेलाटीचे रावसाहेब गव्हाणे, तेलगावच्या सारिका झेंडे, सेवालालनगरचे संजय राठोड व कळमणच्या द्रोपदी जगझाप हे विजयी झाले. कोंडीच्या चंद्रकला वाघमारे, होनसळच्या ज्योती स्वामी व वांगीच्या सरस्वती भोसले यांनी निवडणूक लढवली मात्र पराभूत झाले.
राणी मगर( हगलूर), उज्वला रेवजे( तळेहिप्परगा), बेबी गाडेकर( बीबीदारफळ), आश्वनी पांढरे (बाणेगाव), छाया कोळेकर (वडाळा), कांचन गवळी (नान्नज), जयंत क्षीरसागर (साखरेवाडी), जितेंद्र भोसले (पडसाळी), सुरेखा नवगिरे( खेड), उज्वला पाटील( भोगाव), नंदिनी माने( राळेरास), सविता राठोड( तिर्हे), पुष्पा मसलखांब(पाथरी), पूर्वा वाघमारे (हिरज), शेवंता पवार (गुळवंची) व हबीब जमादार (एकरुख- तरटगाव) आदी विद्यमान सरपंचांनी निवडणूक लढवली नाही.
७ गावचे १७ सरपंच
नुकत्याच निवडणुका झालेल्या २४ पैकी ७ गावात मागील पाच वर्षात १७ व्यक्तींना सरपंचपदाची संधी मिळाली आहे. यामध्ये हगलूर ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून राजकुमार शिंदे, मिराबाई शिंदे, राणी मगर, पाथरीत दीपाली गरड, सुनंदा गुरव, अलका बंडगर व पुष्पा मसलखांब, खेड येथे समाधान भोसले, सुरेखा नवगिरे, गुळवंचीत प्रियंका पांढरे व शेवंता पवार, तळेहिप्परगा येथे धोंडाबाई जाधव व उज्वला रेवजे, होनसळमध्ये प्रतिभा भोजरंगे, ज्योती स्वामी, वडाळ्यात रुपाली गाडे, छाया कोळेकर आदींनी कामकाज पाहिले आहे. उर्वरित १७ गावात १७ व्यक्तींनी सरपंच म्हणून जबाबदारी पार पाडली.