भरीकवटे उपकेंद्राचा पाच हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:06+5:302021-02-13T04:22:06+5:30

या उपकेंद्रास किरनळ्ळी, खैराट, गोगांव, वागदरी, घोळसगांव या सहा गावांना शिरवळ येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रमधून विद्युतपुरवठा होत आहे. ...

Five thousand farmers will benefit from the heavy substation | भरीकवटे उपकेंद्राचा पाच हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

भरीकवटे उपकेंद्राचा पाच हजार शेतकऱ्यांना होणार फायदा

Next

या उपकेंद्रास किरनळ्ळी, खैराट, गोगांव, वागदरी, घोळसगांव या सहा गावांना शिरवळ येथील ३३/११ के. व्ही. उपकेंद्रमधून विद्युतपुरवठा होत आहे. या उपकेंद्रावर कृषी व इतर ग्राहकांची संख्या वाढल्याने सुरळीत वीजपुरवठा होत नव्हता. तांत्रिक अडचणीमुळे विद्युतपुरवठा कमी दाबाने होणे, ओव्हर लोड लाईन ट्रिप होणे. त्यामुळे शेतीवरील विद्युतपंप व डी.पी. (रोहित्र) वारंवार जळत होते. या सहा गावांतील शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन ते चार दिवसच विद्युतपुरवठा होत होता. भुरीकवठे येथे उपकेंद्र सुरु झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल व शेतीवरील मोटारी व ट्रान्स्फार्मर जळण्याचे प्रमाण कमी होईल.

गेल्या ६ वर्षापासून शेतकऱ्यांना खूपच त्रास होत होता. मुबलक पाणी असूनही वीजपुरवठा सुरळीत नसल्याने पिकाला पाणी पुरेशे देता येत नव्हते. यामुळे आर्थिक नुकसान होत होते. या भागातील सर्व शेतकरी व सरपंच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याकडे नवीन उपकेंद्रासाठी मागणी करीत होते. त्याची दखल घेत शेतकऱ्यांची गैरसोयी टाळण्यासाठी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासमोर हा प्रश्न मांडले. त्यानंतर सतत पाठपुरावा केला. त्यामुळे विद्युत उपकेंद्रास मंजुरीचे आदेश प्राप्त झाले. लवकरच कामास सुरुवात होणार होईल. याकामी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सहकार्य लाभल्याचे आ. कल्याणशेट्टी यांनी सांगितले.

Web Title: Five thousand farmers will benefit from the heavy substation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.