विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाच हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:22 AM2021-03-05T04:22:52+5:302021-03-05T04:22:52+5:30

सुभाषनगर भागातील दोन व्यावसायिक दिनेश कचरुलाल सुराणा व आनंद रामलाल मालू यांना विनामास्क व्यवसाय करीत असताना पकडले असता, त्यांनी ...

Five thousand rupees fine for traders doing business without mask | विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाच हजाराचा दंड

विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना पाच हजाराचा दंड

Next

सुभाषनगर भागातील दोन व्यावसायिक दिनेश कचरुलाल सुराणा व आनंद रामलाल मालू यांना विनामास्क व्यवसाय करीत असताना पकडले असता, त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार असल्याचे तसेच त्यांची

दुकाने ३० दिवसांसाठी सील होणार असल्याचा इशारा देताच त्यांनी ताबडतोब दंडाची रक्कम भरुन होणारी कारवाई टाळली. ही कारवाई उपमुख्याधिकारी ज्योती मोरे, स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद, नितीन शेंडगे, हर्षल पवार यांनी केली आहे.

तसेच

शहरातील कसबा पेठेतील विभागीय कार्यालयात तीन नागरिकांना सकाळी गुड मॉर्निंग पथकाने घराबाहेर प्रातर्विधी करताना पकडून त्यांच्याकडून १५०० रुपये दंड वसूल केला आहे.

फोटो

०४बार्शी-कोरोना कारवाई

ओळी

बार्शीत विनामास्क व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यास दंडाची कारवाई करताना उपमुख्याधिकारी ज्योती मोरे व त्यांचे पथक.

Web Title: Five thousand rupees fine for traders doing business without mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.