ग्रामपंचायत मतदानासाठी आले शहरातून पाच हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:40+5:302021-01-16T04:25:40+5:30

करमाळा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींच्या मतदानांसाठी सकाळपासूनच उमेदवार व समर्थकांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदारांना मतदान करण्यास चला, असा तगादा ...

Five thousand voters came from the city for Gram Panchayat voting | ग्रामपंचायत मतदानासाठी आले शहरातून पाच हजार मतदार

ग्रामपंचायत मतदानासाठी आले शहरातून पाच हजार मतदार

Next

करमाळा तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींच्या मतदानांसाठी सकाळपासूनच उमेदवार व समर्थकांनी प्रत्येक घरापर्यंत जाऊन मतदारांना मतदान करण्यास चला, असा तगादा लावल्याने मतदानाची टक्केवारी वाढली.

तालुक्यातील रहिवाशी असलेले पण शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने सर्वाधिक मतदार पुणे शहरात हडपसर, काळेपडळ या भागात आहेत. तसेच नवी मुंंबई, वाशी, पनवेल, ठाणे या भागातील एमआयडीसी क्षेत्रात कामाला असलेल्या व त्या भागात वास्तव्यास असलेल्या मतदारांना आणण्यासाठी खटाटोप करावा लागला. देवळाली, मांगी, पिंपळवाडी, भोसे, हिवरवाडी, पांडे, गुळसडी, फिसरे, नेरले, साडे, गुळसडी, सरपडोह, करंजे, सावडी, कोळगाव, केडगाव, आळसुंदे, बिटरगाव, पोथरे, जातेगाव या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत चुरस निर्माण झाल्याने उमेदवारांनी त्या मतदारांना समक्ष भेटून त्यांचे निर्णायक मतदान आपल्यालाच मिळावे, यासाठी त्यांच्या येण्या-जाण्याचा व खाण्या-पिण्याचा खर्च देऊन खासगी वाहनाने आणले. वाडयावस्त्यावर राहणारे मतदार व वयोवृद्धांना मतदानाला आणण्यासाठी उमेदवार व त्यांचे समर्थक प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले.

फोटो

१५करमाळा निवडणूक

ओळी

हिवरवाडी ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदाच मतदानाचा अधिकार बजावणारे युवा मतदार.

Web Title: Five thousand voters came from the city for Gram Panchayat voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.