पाच टीएमसीचा न्यायालयीन लढा लढावा लागेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:16 AM2021-05-03T04:16:59+5:302021-05-03T04:16:59+5:30
सांडपाण्याच्या नावाखाली उजनीचे ५ टीएमसी पाणी पळवून नेले आहे. याबद्दल जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला ...
सांडपाण्याच्या नावाखाली उजनीचे ५ टीएमसी पाणी पळवून नेले आहे. याबद्दल जिल्ह्यातील एकाही आमदाराने विधिमंडळात आवाज उठवला नाही. त्यामुळे उजनीचे पाणी वाचविण्यासाठी आपल्याला न्यायालयीन लढा उभा करावा लागेल, असे सांगत उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला पळविल्याच्या निषेधार्थ स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोहोळ तालुक्यातील सीना नदीवरील आष्टे बंधारा येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सोलापूर जिल्हा हा सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर राज्यात ओळख निर्माण झाली आहे. मात्र एकही कारखानदार या मुद्यावर तोंड उघडायला तयार नाही. केवळ जनतेच्या बरोबर आहोत असे सांगून स्वतःच्या पक्षनेतृत्वाच्या विरोधात ठाम भूमिका घेत नाहीत. त्यामुळेच आपल्या सर्वांना उजनीचे पाणी वाचवण्यासाठी परिणामांची पर्वा न करता संघर्षासाठी तयार रहावे लागणार आहे.
अशी भूमिका स्व. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे नागेश वनकळसे यांनी मांडली.
यावेळी यशवंतराव चव्हाण उजनी पाणी संघर्ष समितीचे अशोक भोसले,पाणी बचाव संघर्ष समितीचे
नागेश वनकळसे, ॲड. श्रीरंग लाळे, महेश पवार,बाळासाहेब वाघमोडे, दादासाहेब पवार, सिद्धाराम म्हमाणे, शिवाजीराव चव्हाण, सौदागर साठे, केशव वाघचवरे, नानासाहेब सावंत, हर्षल देशमुख,अमर चव्हाण, गणेश लखदिवे,जनार्धन ताकमोगे, बालाजी ताकमोगे, सागर काळे, फंटू कोळेकर, विशाल काळे, तात्या निकम, महेश गावडे, संतोष वाघचवरे, योगेश गोवर्धनकर, दादा हंडोरे, औदुंबर आरेकर यासह मोठ्या प्रमाणावर शेतकरी बांधव उपस्थित होते.
-----