थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 01:07 PM2017-11-21T13:07:35+5:302017-11-21T13:09:08+5:30

७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 

Five Tower Seal of BSNL in Solapur city, without any due diligence | थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई

थकबाकीअभावी सोलापूर शहरातील बीएसएनएलचे पाच टॉवर सील, मनपाची कारवाई

Next
ठळक मुद्देशहरात दूरसंचार खात्याचे २२ मोबाईल टॉवर भाड्याच्या जागेत आहेत७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवरवसुलीसाठी रिलायन्सवर कारवाई केली जाईल : उपायुक्त ढेंगळे—पाटील


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २१  :  ७६ लाखांची थकबाकी न भरणाºया दूरसंचारचे ५ मोबाईल टॉवर सोमवारी मनपाच्या मिळकतकर वसुली पथकाने सील केल्याची माहिती उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील यांनी दिली. 
शहरात दूरसंचार खात्याचे २२ मोबाईल टॉवर भाड्याच्या जागेत आहेत. या टॉवरचा भाडे कर दूरसंचार कंपनीने गेल्या कित्येक वर्षांत भरलेला नाही. त्यामुळे मनपाच्या करसंकलन विभागाचे प्रमुख आर. पी. गायकवाड यांनी बाळीवेस कार्यालयातील सरव्यवस्थापकांना कर भरण्याबाबत वारंवार नोटिसा बजाविल्या होत्या. थकीत कराबाबत दूरसंचारच्या कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार केल्यावर दूरसंचार खात्याच्या अधिकाºयांनी केंद्र शासनाच्या उपक्रमास हा कर लागू होत नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबत त्यांनी गुजरात उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल दाखविला आहे. 
  महाराष्ट्र शासनाने मात्र याबाबत १६ मे २०१७ रोजी अध्यादेश काढून मालमत्ता कर आकारणीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. केंद्र शासनाच्या कार्यालय व इतर इमारतींना सेवा कर लागू असल्याचे यात स्पष्ट केले आहे. त्याप्रमाणे मनपाने भाडे करारावर हा कर  लागू केला आहे. सोलापूर दूरसंचार कार्यालयाकडून ७६ लाख इतकी टॉवरची थकबाकी आहे. हा कर भरण्यास अधिकाºयांनी चालढकल केल्याने सोमवारी पाच टॉवर सील करण्यात आले. कारवाई सुरू असताना दूरसंचारच्या अधिकाºयांनी मनपाशी संपर्क साधून वरिष्ठांशी संपर्क सुरू आहे,कर भरू असे सांगितले.पण करभरल्या शिवाय सील काढले जाणार नाही असे ठणकावण्यात आले.
रिलायन्सवर होणार कारवाई...
मनपाने फक्त दूरसंचारच्या टॉवरवर कारवाई केली अशा तक्रारी आल्याने इतर कंपन्यांची थकबाकी काढण्यात आली आहे. त्यात रिलायन्स कंपनीचे शहरी विभागात जुने १९ टॉवर आहेत. या टॉवरची १६ लाख ११ हजार ८१७ रुपये थकबाकी व चालू वर्षाचा कर ९ लाख १ हजार ३२८ अशी २५ लाख १३ हजार १४५ रुपये इतकी थकबाकी आहे. या रकमेच्या वसुलीसाठी रिलायन्सवर कारवाई केली जाईल असे उपायुक्त ढेंगळे—पाटील यांनी स्पष्ट केले.
-------------------
हे टॉवर केले सील...
४१५ लाख थकबाकीपोटी दूरसंचारचे पुढील टॉवर वीज व बॅटरी कनेक्शन बंद करून सील करण्यात आले आहेत. डफरीन चौक : डॉ. सतीश वळसंगकर कॅम्पस (३ लाख ३५ हजार), कुमार चौक: पंडित वाघे (२ लाख ७२ हजार), उत्तर सदर बझार: कारभासे बंगला (२ लाख ९३ हजार), दत्तनगर: आडकी बंगला (२ लाख ८२ हजार), जुना अक्कलकोट नाका:  गंगा टॉवर (३ लाख). उर्वरित १७ टॉवर मंगळवारी सील करण्यात येणार आहेत. 

Web Title: Five Tower Seal of BSNL in Solapur city, without any due diligence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.