पतीसह पाच जण कोरोनाने गेले; मदतीसाठी मानवाधिकार संघटना धावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:26 AM2021-08-22T04:26:52+5:302021-08-22T04:26:52+5:30
करमाळा येथील तरन्नूम इक्बाल शेख ही टेंभुर्णी येथून प्रसूतीसाठी करमाळा येथे माहेरी आली होती. १२ मे २१ रोजी प्रसूत ...
करमाळा येथील तरन्नूम इक्बाल शेख ही टेंभुर्णी येथून प्रसूतीसाठी करमाळा येथे माहेरी आली होती. १२ मे २१ रोजी प्रसूत झाली. दरम्यान सासरी टेंभुर्णी येथे कोरोनाने या कुटुंबीयांवर घाला घातला. परिवारातील पती इक्बालसह पाच व्यक्ती मरण पावल्या. सध्या त्या तीन महिन्यांचे बाळ राहतअलीसमवेत राहतात. बाळाचे पितृछत्र कोरोनाने हिसकावून घेतले. तरन्नूमच्या माहेरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारी मदतीसाठी हे कुटुंब वणवण फिरत आहे.
महिला दक्षता समितीचे सर्व पदाधिकारी, अंजली श्रीवास्तव, मानवाधिकार सुरक्षा संघटनेच्या ज्योती पांढरे, उषा बलदोटा, शगुप्ता शेख, भावना गांधी, रा.यु.काँ.चे उपाध्यक्ष अशपाक जमादार, विशाल घोलप यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. काम होईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले. यावेळी शेख कुटुंबांना अश्रू आवरता आले नाहीत.
----