केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे ध्वजारोहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:30+5:302021-03-15T04:21:30+5:30
सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या आवारात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला (सीआयएसएफ)च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती ...
सोलापूर : फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या आवारात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बला (सीआयएसएफ)च्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
५२ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने एनटीपीसी परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गट जनरल व्यवस्थापक एन. श्रीनिवास राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सीआयएसएफचे सहायक कमांडन्ट बी. व्ही. दुर्गा प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रमुख अतिथी दुर्गा प्रसाद म्हणाले, देशातील उद्योगांची सुरक्षाविषयक बाबींची मोठी जबाबदारी अनेक वर्षे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल सांभाळत आहे. बलाच्या जवानांना त्यासाठी खडतर परिश्रम आणि अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. देशवासीयांना या त्यागाची जाणीव राहिली आहे. यानिमित्ताने जवानांचे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. बहारदार संचलन करण्यात आले. कार्यक्रमास एनटीपीसीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
----
१४ एनटीपीसी
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने ध्वजारोहण करताना सहायक कमांडन्ट बी. व्ही. दुर्गा प्रसाद.