उजनी जलाशयात वाळू उपशामुळे फ्लेमिंगोचा अधिवास धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:21 AM2021-03-15T04:21:23+5:302021-03-15T04:21:23+5:30
उजनी जलाशय हा विस्तीर्ण असतानाच जलाशय परिसरात पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपुरवठा करणाऱ्या दलदलयुक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय उजनीचा ...
उजनी जलाशय हा विस्तीर्ण असतानाच जलाशय परिसरात पक्ष्यांसाठी मोठ्या प्रमाणात खाद्यपुरवठा करणाऱ्या दलदलयुक्त जागा मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय उजनीचा परिसर पक्ष्यांसाठी पोषक असल्याने शेकडो प्रजातींचे देशी व परदेशी पक्ष्यांचा अधिवास या ठिकाणी सातत्याने आढळत आला आहे. पक्ष्यांच्या या अस्तित्वामुळे उजनी परिसराचे सौंदर्य खुलत असून पक्षी निरीक्षक, निसर्गप्रेमींसाठी पक्षी निरीक्षणाची मोठी संधी मिळत आहे. अशा स्थितीत उजनी परिसरात यांत्रिक बोटीद्वारे होणारा वाळू उपसा पक्ष्यांच्या अस्तित्वापुढील मोठी समस्या बनू लागला आहे.
सातत्याने वाळू उपसा होत असल्याने फ्लेमिंगो पक्ष्यांचा चराऊ प्रदेश नष्ट होवू लागला आहे. प्रामुख्याने चिखलयुक्त खाद्य उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
सद्यस्थितीत गुजरातमधील कच्छच्या रणात वीण घालून नव्या पिल्लांसह हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी उजनीवर दाखल झाले आहेत. सामान्यतः मे अखेरपर्यंत ते उजनी परिसरात थांबतात. मात्र, वाळू उपशामुळे त्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचविणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोट ::::::::::
उजनी परिसरात सध्या ज्या ठिकाणी फ्लेमिंगोचा अधिवास आहे, तेथे वाळू उपसा करण्यासाठी मोठ्या आकाराच्या बोटी उभ्या आहेत. या परिसरात सातत्याने होणाऱ्या वाळू उपशामुळे परदेशी पक्ष्यांना धोका निर्माण झाला आहे.
- डॉ. अरविंद कुंभार,
पक्षी निरीक्षक
फोटो
१४ करमाळा-उजनी०१
डिकसळ पुलाजवळ जेथे देशी-विदेशी पक्षी मुक्त विहार करतात. तेथेच यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा होत आहे.
१४करमाळा-उजनी०२
उजनी पाणलोट क्षेत्रात विहार करणारे फ्लेमिंगो पक्ष्यांचे संग्रहित छायाचित्र.