विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 09:22 AM2020-10-16T09:22:12+5:302020-10-16T09:22:48+5:30

पंढरपूर शहरात शिरले पाणी; हजारो नागरिकांचे स्थलांतर

Flood waters on the orbit of Vitthal; Citizens have to travel by boat | विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास

विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी; नागरिकांना करावा लागतोय होडीने प्रवास

Next

पंढरपूर : उजनी धरणातून सोडलेले पाणी पंढरपूर मध्ये पोहोचले, त्यामुळे चंद्रभागेला पूर आला आहे. पुराचे पाणी विठ्ठलाच्या प्रदक्षिणा मार्गावर आले असून या परिसरातील नागरिकांना करण्यासाठी वापर करावा लागत आहे.


भीमा नदी २ लाख ८७ क्यूसेक ने सध्या वाहत आहे. तरी पाऊसामूळे मिसळणाऱ्या पाण्यामुळे साडेतीन लाखांच्या आसपास पाणी पातळी आहे. यामुळे शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण, लखुमाई मंदिर, गोविंदपुरा, आंबेडकर नगर, दत्तनगर आधी परिसरामध्ये पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये चार ते पाच फूट पाणी आहे. महापुरामुळे पंढरपुर शहर व तालुक्यातील आता पर्यंत ८ हजार ५६० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

प्रदक्षिणा मार्गावर पुराचे पाणी आहे. यामुळे या परिसरातील नागरिक घरातून बाहेर पडताना होडीने प्रवास करत आहेत.

Web Title: Flood waters on the orbit of Vitthal; Citizens have to travel by boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.