निर्जला एकादशीनिमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 08:33 AM2021-06-21T08:33:18+5:302021-06-21T08:33:57+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
पंढरपूर : निर्जला एकादशीनिमीत्त श्री. विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलांची आकर्षक व मनमोहक अशी सुंदर आरास करण्यात आली आहे.
प्रत्येक हिंदू सण, उत्सव, स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी आकर्षक फुलांची सजावट करण्यास श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने सुरू करण्यात आली आहे.
याच एक भाग म्हणून निर्जला एकादशीनिमीत्त ही विठ्ठल व रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची सजावट करण्याचे आयोजन केले होते. यामुळे वडगाव धायरी (पुणे) येथील उद्योजक सचिन चव्हाण, संदीप पोकळे यांनी मंदिरातील फुलांच्या सजावटीचा खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. याची दाखल घेत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सचिन चव्हाण यांना सजावट करण्याची संधी दिली.
ऑरकेट, गुलाब, कामिनी, गुलछडी, पिकं डीजे, झेंडू अशा ५०० किलो फुलांची सजावट श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा गाभारा, नामदेव पायरी, सोळखांबी परिसरात करण्यात आली आहे. यामुळे मंदिर अधिक आकर्षक दिसत होते.