बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलाऱ्याला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:21 AM2021-04-13T04:21:25+5:302021-04-13T04:21:25+5:30

सोमवती अमावास्येच्या पूजेसाठी बेलपत्र आणि फुले आणण्यासाठी श्री महासिद्ध देवस्थानचे फुलारी पिरपा आमसिद्ध फुलारी (वय ५६) हे रात्री दोन ...

Flower beaten to death for fetching bel leaves | बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलाऱ्याला बेदम मारहाण

बेलपत्र आणण्यासाठी गेलेल्या फुलाऱ्याला बेदम मारहाण

Next

सोमवती अमावास्येच्या पूजेसाठी बेलपत्र आणि फुले आणण्यासाठी श्री महासिद्ध देवस्थानचे फुलारी पिरपा आमसिद्ध फुलारी (वय ५६) हे रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आंबेडकरनगर परिसरात गेले होते. बेलपत्र घेऊन परतत असताना हल्लेखोरांनी त्यांना अडवले त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा दिला आणि बेदम मारहाण केली. यात पिरप्पा फुलारी यांच्या डोक्याला खांद्याला जबर दुखापत झाली दुचाकीवरून ते खाली पडले. त्यानंतर मृत झाले असावेत असे समजून हल्लेखोर तेथून पसार झाले.

सकाळी शेतकऱ्यांनी त्यांना उचलून सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमी पिरपा पुजारी बेशुद्धावस्थेत होते. त्यांना उशिरापर्यंत बोलता येत नव्हते, त्यामुळे फिर्याद दाखल करण्यात आली नाही.

मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. नितिन थेटे यांनी घटनास्थळाची पाहणी करून माहिती घेतली जखमी शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्याकडून घटनेची रितसर फिर्याद नोंदवून घेणार असल्याचे डॉ. थेटे यांनी सांगितले.

-------

दक्षिणेच्या वादाची दिली होती तक्रार

जखमी पिरप्पा फुलारी यांनी २ मार्च रोजी श्री महासिद्ध मंदिराचे पुजारी महासिद्ध चिकावडरे, शिलीसिद्ध चिकावडरे आणि गौरप्पा चिकावडरे भक्तांकडून मिळणाऱ्या दक्षिणा, धान्याची वाटणी देण्यावरून शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार मंद्रुप पोलीस ठाणे आणि मंद्रुपच्या अप्पर तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्याकडे केली होती. दोन्ही अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन वाद मिटवला होता.

-------

Web Title: Flower beaten to death for fetching bel leaves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.