बार्शीत बाहेर भरणारा फुलबाजार आता बाजार समितीच्या आवारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:17+5:302021-01-13T04:56:17+5:30
यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे, निरीक्षक गोकुळदास मांजरे, दिलीप पवार व तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी, ...
यावेळी बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे, निरीक्षक गोकुळदास मांजरे, दिलीप पवार व तालुक्यातील फूल उत्पादक शेतकरी, खरेदीदार, अडते उपस्थित होते.
कित्येक वर्षांपासून शहरातील शनी मंदिराजवळ फुलांच्या खरेदी-विक्रीचा बाजार भरत होता. ५-६ वर्षांपासून फूल उत्पादक शेतकऱ्यांची व खरेदीदारांची आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे फुलांचा बाजार शासकीय बाजार समितीत भरवावा, अशी मागणी होत होती. आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकरी बांधवांना प्रशस्त जागेत फुलांची खरेदी-विक्रीचा करता यावी यासाठी हा लिलाव बाजार समितीत सुरू करण्याचा निर्णय घेतला.
चेअरमन रणवीर राऊत यांनी व्यापारी व खरेदीदार, शेतकरी यांच्यामध्ये चांगले संबंध व विश्वासार्ह व्यवहार कसा होईल, याकडेही आम्ही लक्ष देत आहोत. कोणावरही अन्याय होणार नाही, याची खबरदारी घेत आमचे सर्व संचालक मंडळ काम करत असल्याचे सांगितले.
पहिल्याच दिवशी दोन लाखांची उलाढाल
सोमवारी पहिल्याच दिवशी तालुक्यातील कव्हे, कोरफळे, ताडसौदणे, पाथरी, पांढरी, चिंचोली, देवगाव, तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परंडा, जवळा, तेरखेडा ठिकाणाहून गुलाब, गुलछडी, गलांडा, झेंडू, शेवंती, आस्टर, काकडा आदी फुले शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणली हाेती. पहिल्याच दिवशी जवळपास दोन लाख रुपयांची उलाढाल झाली. फुलबाजारात २ अडत्यासह स्थानिक व माढा, कुर्डुवाडी, उस्मानाबाद आदी ठिकाणचे २५ खरेदीदार उपस्थित होते. पहिल्या दिवशी गलांडा १० ते १५, १० गुलाबाची पेंडी १० ते २० रुपये, गुलछडी, शेवंती ७० ते १०० रुपये असा दर मिळाला.
फोटो
११बार्शी फुलबाजार
ओळी
बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात फुलबाजार सुरू झाल्यानंतर लिलाव सुरू असताना भेटीप्रसंगी चेअरमन रणवीर राऊत, व्यापारी, शेतकरी.