यमाई देवी मंदिर पुनर्जीवनासाठी केंद्राकडे पाठपुरावा -शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:00+5:302021-09-14T04:27:00+5:30
मोडनिंब : माढा विधानसभा मतदारसंघातील आणि माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील यमाई मंदिराची व इतर वस्तूची दुरुस्ती करून नवीन ...
मोडनिंब : माढा विधानसभा मतदारसंघातील आणि माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील यमाई मंदिराची व इतर वस्तूची दुरुस्ती करून नवीन कामे पुरातत्व विभागाकडून मंजूर होऊन केंद्र शासनाकडून त्यास निधी मिळावा म्हणून केलेल्या मागणीस केंद्राकडून हिरवा कंदील मिळाल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.
क्षेत्र यमाई देवीचे पुरातन व प्रसिद्ध मंदिर असून याठिकाणी इतर देवतांची ही मंदिरे आहेत. या यमाई देवी मंदिरासमोरील बारव गेल्या पाच वर्षांपासून पडझड झाली आहे. पुरातन दीपमाळ धोकादायक बनलेली आहे. या मंदिराकडे येणारा मुख्य मार्ग ही बंद असून तो खराब झाला आहे. या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून आमदार बबनराव शिंदे यांनी पुरातत्व विभागास पत्र दिले होते. केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी, राज्यसभा सदस्य खासदार शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे पत्र देऊन आमदार बबनराव शिंदे यांनी मागणी केली आहे.
-----
फोटो : १३ यमाई देवी