नियम पाळू.. काही तास तरी परवानगी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:22 AM2021-04-08T04:22:55+5:302021-04-08T04:22:55+5:30

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मंद्रूप पोलिसांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सकाळपासून एकही दुकान उघडता आले ...

Follow the rules .. allow at least a few hours! | नियम पाळू.. काही तास तरी परवानगी द्या!

नियम पाळू.. काही तास तरी परवानगी द्या!

Next

ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मंद्रूप पोलिसांनी निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. सकाळपासून एकही दुकान उघडता आले नाही. त्यामुळे दुपारी सर्व दुकानदार एकत्र आले, त्यांनी अतिरिक्त तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांची भेट घेतली. आम्ही नियम आणि कायद्याचे काटेकोर पालन करू. गेल्या वर्षभरामध्ये व्यापार थंडावला आहे. कर्जाचा बोजा वाढत आहे. आर्थिक संकटाशी सामना करावा लागत असल्याने पूर्णवेळ बंद ठेवण्याऐवजी थोडीशी सवलत द्या, अशी विनंती करणारे निवेदन व्यापाऱ्यांनी दिले.

दुकाने बंद ठेवल्यास दुकान भाडे वीज बिल कामगारांचा पगार बँक कर्जाचे हप्ते आणि व्याजाचा बोजा अशा असंख्य संकटामुळे आर्थिक बोजा वाढणार आहे. हा विचार करून आम्हाला न्याय द्या, अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याची हमी त्यांनी यावेळी दिली.

निवेदनावर किराणा दुकानदार कापड व्यावसायिक कृषीविषयक मालाची दुकाने आधी व्यापाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तहसीलदार उज्ज्वला सोरटे यांच्या भेटीनंतर शिष्टमंडळाने मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन थेटे यांची भेट घेतली.

Web Title: Follow the rules .. allow at least a few hours!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.