राजशिष्टाचार पाळा, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या; बीआरएसचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2023 10:36 AM2023-06-27T10:36:56+5:302023-06-27T10:37:33+5:30

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केसीआर आपल्या मंत्री मंडळासह मंगळवारी सकाळी नऊ वाजता येणार आहेत.

Follow the royal etiquette, let the ministers along with the Chief Minister KCR have darshan of Vitthal; Appeal of BRS | राजशिष्टाचार पाळा, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या; बीआरएसचे आवाहन

राजशिष्टाचार पाळा, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना विठ्ठलाचे दर्शन घेऊ द्या; बीआरएसचे आवाहन

googlenewsNext

- सचिन कांबळे 

पंढरपूर : तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याबरोबर आलेल्या मंत्री व आमदारांना विठ्ठलाचे दर्शन नाकारू नये. महाराष्ट्र शासनाने राज्य शिष्टाचार पाळावा असे मत बी.आर.एसचे जयकुमार बेलखडे यांनी सांगितले.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी केसीआर आपल्या मंत्री मंडळासह मंगळवारी सकाळी नऊ वाजता येणार आहेत. त्यांनतर राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश आहे. यानिमित्त बेलखडे सोमवारी पंढरपूरला आले होते.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. लवकरच ते पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याची सुरुवात भालके यांच्या रूपाने झाली आहे.

मोदी सरकारच्या विरोधात जे जातात. त्यांच्यावर इडी व सीबीआय कारवाई करते. मात्र आमच्याकडे त्यांना काही सापडणार नाही. आमची संपत्ती पंतप्रधान यांना दान करू असे बेलखडे यांनी सांगितले.

Web Title: Follow the royal etiquette, let the ministers along with the Chief Minister KCR have darshan of Vitthal; Appeal of BRS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.