वाहतूक नियमांचे पालन करा, अपघाताचे प्रमाण कमी होईल : गायकवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:21 AM2021-01-21T04:21:12+5:302021-01-21T04:21:12+5:30
येथील तालुका विधि सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह आणि राष्ट्रीय ...
येथील तालुका विधि सेवा समिती व तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह आणि राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश आर. एन. गायकवाड होते. याप्रसंगी परिवहन विभागाचे निरीक्षक सोनटक्के यांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाचा उद्देश सांगत रस्त्यावरील वाहतूकसंबंधीच्या चिन्हांबाबत माहिती दिली, तर महामार्ग पोलीस विभागाचे निरीक्षक सय्यद यांनी सांगितले की, देशात दररोज अपघातामुळे एक ते दीड लाख लोक मरण पावतात. अपघात होण्यामागील कारणे सांगून रस्ता सुरक्षेसंबंधी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष एस. डी. पवार, उपाध्यक्ष आर. एस. शेख, सचिव एस. बी. कुलकर्णी यांच्यासह लोकनेते साखर कारखान्याचे ट्रॅक्टर चालक व मालक तसेच शहरातील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व चालक उपस्थित होते.
शिबिरासाठी शिवकुमार आलूर, अमित निमगावकर, संदीप वनकळसे यांच्यासह ॲड. कैलास खडके, ॲड. तानाजी पाटील, ॲड. रमेश पाटील, ॲड. नामदेव कांबळे, ॲड. विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले.
मोहोळ तालुका विधि सेवा शिबिरादरम्यान कोविड- १९ च्या अनुषंगाने शासनाच्या सर्व निर्देशांचे पालन करण्यात आले होते. सूत्रसंचालन एस. बी. कुलकर्णी यांनी केले. आभार एस. डी. पवार यांनी मानले.
फोटो ओळी : २०मोहोळ
रस्ते सुरक्षा सप्ताह व राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने उपस्थितांना मार्गदर्शन करताना दिवाणी न्यायाधीश आर. एन. गायकवाड.