पंढरपुरात दूध आलेल्या वाहनावर अन्न व औषध विभागाची कारवाई ; १८८० लिटर दूध नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 09:27 PM2021-02-03T21:27:58+5:302021-02-03T21:28:24+5:30

साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर लि. या पेढीला व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Food and Drug Department action on a vehicle carrying milk in Pandharpur; 1880 liters of milk destroyed | पंढरपुरात दूध आलेल्या वाहनावर अन्न व औषध विभागाची कारवाई ; १८८० लिटर दूध नष्ट

पंढरपुरात दूध आलेल्या वाहनावर अन्न व औषध विभागाची कारवाई ; १८८० लिटर दूध नष्ट

googlenewsNext

पंढरपूर : सांगली जिल्ह्यातून पंढरपूरमध्ये भेसळ केलेले दूध घेऊन येणाऱ्या एम एच ०९ सी यू ०००७ या वाहनाला पकडून १८८० लिटर दूध नष्ट केले. भेसळ केलेले दूध स्वीकारणाऱ्या साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर लि. या पेढीला व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी दिली.

सांगली जिल्ह्यातून एम एच ०९ सी यू ०००७ या क्रमांकाचे निळ्या रंगाच्या वाहनांमध्ये  भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांना मिळाली. या गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली. या पेढीची तपासणी केली. या पेढी भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून आले.

पेढीत संशयित भेसळीचे अंदाजे १०० लिटर दूध स्वीकारल्याचे व टेम्पोत संशयित भेसळीचे अंदाजे १८८० लिटर आढळून आले. यामुळे संशयित भेसळीच्या दोन्ही दुधाचे नमुने विश्लेषणाकरिता ताब्यात घेण्यात आले. त्यानतंर उर्वरित साठा जन आरोग्याचा विचार करिता जागेवर नष्ट करण्यात आला. 

तसेच साबरकांथा पेढीत अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार आवश्यक तंत्रज्ञ नसल्याचे तसेच पेढी विनापरवाना असल्याचे दिसून आलेने पेढीस जागेवर व्यवसाय थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत श. कुचेकर, सहकारी अन्न सुरक्षा आधिकरी योगेश देशमुख, सहाय्यक आयुक्त (अन्न) प्र. मा. राऊत यांनी केली आहे.

--------------------------------
सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.

Web Title: Food and Drug Department action on a vehicle carrying milk in Pandharpur; 1880 liters of milk destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.