पंढरपुरातील भेसळयुक्त दूध पेढीवर अन्न औषध प्रशासनाची धाड
By appasaheb.patil | Published: December 24, 2019 05:00 PM2019-12-24T17:00:26+5:302019-12-24T17:03:35+5:30
जाणून घ्या...दूध तयार करण्यासाठी या रासायनिक पावडरचा केला जात होता वापर..!
सोलापूर : पंढरपूर शहरात विविध रासायनिक पावडरचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करणाºया पेढीवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकली़ या धाडीत ५०० लिटर भेसळयुक्त दूध ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
दरम्यान, शेटफळ (ता़ पंढरपूर) येथील शहाजी गोपाळ साबळे यांचे शाम दूध संकलन केंद्र आहे़ या केंद्रात अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अनुषंगे अन्न व औषध प्रशासनाच्या विशेष पथकाने तपासणी केली. तपासणीवेळी सदर आस्थापना पाण्यात व्हे परमिट पावडर, लॅक्टोज पावडर व रिफार्इंड कॉटनसीड तेल टाकून सदर द्रावण मिक्सरवर फिरवून कृत्रिम भेसळकरी दूध तयार करताना आढळून आली.
सदर संकलन केंद्रावर संकलन होणाºया ५०० लिटर दुधात सदर भेसळकरी दूध मिक्स करून दुधाची गुणवत्ता कृत्रिमरीत्या वाढवून जास्त नफेखोरी करण्याचा व्यवसाय सदर संकलन केंद्रावर चालू असल्याचे दिसून आले. त्यामुळे सदर पेढीस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर पेढीस भेसळकारी पदार्थाच्या पुरावठादारांवर तसेच भेसळीचे दूध स्वीकार करणाºया पेद्यामधील जबाबदार व्यक्तीवर अधिकृत माहिती प्राप्त होताच प्रथम खबरी अहवाल दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने सांगितले.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर, मंगेश लवटे यांनी सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, कोणत्याही प्रकारची भेसळ अन्न पदार्थात खपवून घेतली जाणार नाही अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी केले आहे.