सोलापुरात पैसे देण्यास नकार दिल्यामुळे; मासेमार तरुणावर कोयत्यानं खुनी हल्ला

By विलास जळकोटकर | Published: August 1, 2023 06:49 PM2023-08-01T18:49:48+5:302023-08-01T18:50:01+5:30

सोलापूर : पैसे देण्यास नकार दिल्यानं मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकावर सहाजणांनी मिळून कोयत्यानं वार करुन गंभीर जखमी केले. रविवारी सायंकाळी ...

for refusing to pay in Solapur; A young fisherman was attacked by a coyote | सोलापुरात पैसे देण्यास नकार दिल्यामुळे; मासेमार तरुणावर कोयत्यानं खुनी हल्ला

सोलापुरात पैसे देण्यास नकार दिल्यामुळे; मासेमार तरुणावर कोयत्यानं खुनी हल्ला

googlenewsNext

सोलापूर : पैसे देण्यास नकार दिल्यानं मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकावर सहाजणांनी मिळून कोयत्यानं वार करुन गंभीर जखमी केले. रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. दवाखान्यात उपचार घेत असल्याने आज तक्रार दिल्याने मंगळवारी सदर बझार पोलीस ठाण्यात सहाजणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

करण शिवानंद जाधव (वय- २८) असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिल नागेश गायकवाड (सेटलमेंट कॉलनी), धीरज अशोक जाधव (विजापूर नाका २ झोपडट्टी), प्रदीप यल्लप्पा जाधव (रा. सेटलमेंट) यांच्यासह अन्य दोघे अशा सहाजणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे.

यातील जखमी मासेमारी व्यवसाय करणारा तरुण सेटलमेंट फ्री कॉलनीमध्ये वास्तव्यास आहेत. रविवारी तो मोदी स्मशानभूमीच्या लगत बसला असताना वरील आरोपी तेथे आले. त्यांनी करणला पैशाची मागणी केली. यावर त्याने नकार देताच सोबत आणलेल्या कोयत्यानं एकान त्याच्या डोक्यावर वार केला.

दुसऱ्या लोखंडी पाईपनं प्रहार केला. इतरांनी दगडांचा मारा केला. यामध्ये कसाबसा जीव वाचवून करणने शासकीय रुग्णालय गाठले. तेथून खासगी रुग्णालयात धाव घेतली. उपचारांतर त्याने सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकोलीकर करीत आहेत.

Web Title: for refusing to pay in Solapur; A young fisherman was attacked by a coyote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.