वंदे भारत एक्स्प्रेस वेळेत येण्यासाठी, ‘सिद्धेश्वर’रात्री सव्वादहा वाजता सोडा

By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 21, 2023 05:51 PM2023-02-21T17:51:27+5:302023-02-21T17:54:47+5:30

सिद्धेश्वर एक्स्प्रेस रोज रात्री साडेदहा वाजता फलाट क्रमांक एकवरून सुटणार आहे. याच एक नंबर फलाटवर वंदे भारतची गाडी येणार आहे. सिद्धेश्वर गाडी सव्वादहा वाजता रेल्वे स्थानकावरून सोडल्यास वंदे भारतला स्टेशन बाहेर थांबण्याची गरज राहणार आहे.

For Vande Bharat Express to arrive on time, leave Siddheshwar at 10:15pm | वंदे भारत एक्स्प्रेस वेळेत येण्यासाठी, ‘सिद्धेश्वर’रात्री सव्वादहा वाजता सोडा

वंदे भारत एक्स्प्रेस वेळेत येण्यासाठी, ‘सिद्धेश्वर’रात्री सव्वादहा वाजता सोडा

googlenewsNext

सोलापूर : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस सोलापूर रेल्वे स्थानकावर वेळेवर म्हणजे रात्री १० वाजून ४० मिनिटांनी येण्यासाठी सिद्धेश्वर एक्स्प्रेस रात्री १० वाजून ४० मिनिटांनी सोडण्याऐवजी रात्री साडेदहा वाजता सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यावर प्रवासी सेवा संघाने आक्षेप घेतला असून रात्री साडेदहाऐवजी सव्वादहा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून सोडण्याची विनंती केली आहे.

सिद्धेश्वर एक्स्प्रेस रोज रात्री साडेदहा वाजता फलाट क्रमांक एकवरून सुटणार आहे. याच एक नंबर फलाटवर वंदे भारतची गाडी येणार आहे. सिद्धेश्वर गाडी सव्वादहा वाजता रेल्वे स्थानकावरून सोडल्यास वंदे भारतला स्टेशन बाहेर थांबण्याची गरज राहणार आहे. सिद्धेश्वर गाडी लवकर सोडल्यास वंदे भारत गाडी आणखीन लवकर सोलापूर स्थानकावर येईल, असे प्रवासी संघाचे म्हणणे आहे. तसेच कोरोनापूर्वी सिद्धेश्वर गाडीला मोहोळ आणि माढा स्थानकावर थांबा होता. सदर थांबा पूर्ववत करावा, अशी मागणी प्रवासी संघाचे अध्यक्ष संजय पाटील, सचिव संजय चौगुले यांनी केली आहे.
 

Web Title: For Vande Bharat Express to arrive on time, leave Siddheshwar at 10:15pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.