फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

By विलास जळकोटकर | Published: January 16, 2024 06:23 PM2024-01-16T18:23:01+5:302024-01-16T18:23:31+5:30

पिडितेची ठाण्यात धाव : आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Forced abuse of lodges by deception; Complaint of the married woman to the police | फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीनं अत्याचार; विवाहितेची पोलिसात तक्रार

सोलापूर : भोळसर नवरा असल्यानं विवाहितेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेले आणि जबरदस्तीचं अत्याचार केल्याची तक्रार पिडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापूरे याच्याविरुद्ध भा. द. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पिडिता शहरातील एका पेठेत राहते. ती राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पिडिता व तिच्या पतीशी ओळख झाली. पिडिता व तिचे पती हाऊसकिपिंगचे काम करुन कुटुंबाची गुजराण करतात. पिडितेचा पती भोळसर असल्याचा लाभ उठवत आरोपी १ डिसेंबर रोजी पिडिोच्या कामाच्या ठिकाणी गेला. तेथून महत्त्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेले. तेथे ‘तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे. मी तुझा सांभाळ करतो’ असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करुन अत्याचार केला. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी गु्न्हा दाखल होताच सहा. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वना सिद, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख, यांनी पिडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊघाले करीत आहेत.

 

Web Title: Forced abuse of lodges by deception; Complaint of the married woman to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.