पती अन् मुलास ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर जबरदस्तीनं अत्याचार
By विलास जळकोटकर | Updated: April 24, 2024 18:36 IST2024-04-24T18:34:48+5:302024-04-24T18:36:00+5:30
साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे.

पती अन् मुलास ठार मारण्याची धमकी देऊन विवाहितेवर जबरदस्तीनं अत्याचार
सोलापूर : पतीच्या मित्रानं ओळखीनं संवाद वाढवत कौटुंबिक वादाचा गैरफायदा घेऊन एका व्यापारी तरुणानं विवाहित महिलेवर जबरदस्तीनं अत्याचार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील एका नगरात २०२० पासून हा प्रकार घडला असून, पती व मुलाला ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही पिडितेने म्हटले आहे. साहिल उर्फ शाहरुख तौसिफ बागवान (वय- २५, रा. सोलापूर) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, यातील आरोपी हा पिडितेच्या पतीचा मित्र आहे. तो लसून विक्रीचा व्यवाय करतो. हातउसने पैशाच्या निमित्ताने तो पिडितेचा पती व सासूकडे याचा. यामुळे पिडितेची ओळख झाली. घरातील कौटुंबिक वाद सांगत असल्याने याचा गैरफायदा घेत अगोदर २०२० मध्ये जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराची वाचत्या केली तर पती व मुलाला ठार मारण्याची धमकी दिल्याने पिडिता घाबरुन गप्प होती.
असा प्रकार नेहमीच होऊ लागला. दरम्यानच्या काळात त्याने पिडितेला ‘पतीला सोडून दे, आपण लग्न करु असे आमिषही दाखवून तो अत्याचार करीत राहिला. या साऱ्या प्रकाराने पिडिता मानसिक तणावाखाली आली. अखेर तिने मंगळवारी जोडभावी पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, शेख, महिला फौजदार शेख यांनी भेट देऊन पिडितेचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. अधिक तपास फौजदार नशीपून शेख करीत आहेत.