उजनीकाठी आले मानसरोवर, मंगोलियातून परदेशी पाहुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:39+5:302020-12-25T04:18:39+5:30

पांढरेशुभ्र डोके, त्यावर दोन काळ्या समांतर पट्ट्या ही कदंब हंस पक्षी ओळखण्याची खूण आहे. प्रणयी जोडी म्हणून ख्याती असलेले ...

Foreign visitors from Mongolia came to Mansarovar near Ujjain | उजनीकाठी आले मानसरोवर, मंगोलियातून परदेशी पाहुणे

उजनीकाठी आले मानसरोवर, मंगोलियातून परदेशी पाहुणे

Next

पांढरेशुभ्र डोके, त्यावर दोन काळ्या समांतर पट्ट्या ही कदंब हंस पक्षी ओळखण्याची खूण आहे. प्रणयी जोडी म्हणून ख्याती असलेले चक्रवाक अर्थात ब्राह्मणी बदक हे देखणे पक्षी मंगोलियातून उजनी काठावर या आठवड्यात आले आहेत. स्थानिक बदकांपेक्षा मोठ्या आकाराची ही बदके सोनेरी रंगाची असतात.

उजनी जलाशयाच्या सौंदर्यातील मुख्य घटक म्हणून ओळख असलेले फ्लेमिंगो अर्थात रोहित अद्याप आलेले नाहीत. उत्तरेकडे हिमवर्षावाला सुरुवात झाली असून, त्यांच्या प्रवासाला अनुकूल वातावरण निर्माण झाल्यामुळे येत्या पंधरवड्यात उजनीत दाखल होतील.

स्थानिक पक्ष्यांचा मोठा वावर

चित्रबलाक, नळ्या, पाणकावळे, शेकाट्या वारकरी, राखी बगळे, हळदीकुंकू बदके लक्षणीय संख्येने सध्या धरण क्षेत्रात आढळून येत आहेत. हिवाळ्यात येऊन उन्हाळा संपेपर्यंत भारतातील अन्य राज्यांतून येणाऱ्या जांभळी बगळ्यांच्या अनेक जोड्या पाणलोट क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र, युरोपातून दरवर्षी खास करून उजनीतील चिलापी माशांची चव चाखण्यासाठी येणाऱ्या मत्स्यघारींनी मात्र यावर्षी आपली वारी चुकवली आहे.

ही आहेत पक्षी सौंदर्याची ठिकाणे

उजनी धरण पाणलोट इलाख्यात करमाळा तालुक्‍यातील कोंढारचिंचोली, टाकळी, कात्रज, रामवाडी, खातगाव, केत्तूर, गोयेगाव, वाशिंबे, केडगाव, कुगाव तसेच डिकसळजवळ रेल्वेच्या जुन्या पुलाजवळचा परिसर आणि इंदापूर तालुक्‍यातील कुंभारगाव व पळसदेव या ठिकाणी विविधरंगी पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या धरणात १०० टक्‍क्‍यांहून अधिक पाणी आहे. पक्ष्यांचा चराऊ भाग अद्याप पाण्याखाली बुडून आहे. त्यामुळे पक्ष्यांनी धरणाकडे पाठ फिरवली आहे. पुढील काही दिवसांत फ्लेमिंगोसह अन्य स्थलांतरित पक्षी येतील.

-- डॉ. अरविंद कुंभार,

ज्येष्ठ पक्षी अभ्यासक

हवामान बदलामुळे उजनीचे वैभव व आकर्षण समजल्या जाणाऱ्या फ्लेमिंगो या पक्ष्याचे आगमन मात्र लांबणीवर पडले आहे. असे असले तरी ते निश्‍चितच येतील. उजनी जलाशयावर सध्या युरोप, सैबेरिया येथून पक्ष्यांचे आगमन झाले आहे.

- कल्याणराव साळुंके, पक्षीप्रेमी

===Photopath===

241220\24sol_2_24122020_4.jpg

===Caption===

उजनी जलाशयाच्या काठावर मानसरोवरासह विविध देशांतून आलेले दिमाखदार परदेशी पाहुणे.

Web Title: Foreign visitors from Mongolia came to Mansarovar near Ujjain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.