कुरघोटमध्ये वन विभागाकडून कर्मचारी तैनात, मगर आल्याने नागरीक सतर्क, जनजागृतीस सुरुवात
By शीतलकुमार कांबळे | Published: May 29, 2024 03:05 PM2024-05-29T15:05:42+5:302024-05-29T15:06:05+5:30
कुरघोट येथे मगर आल्याचा फोटो सोशस मीडियावर वायरल झाला. त्यामुळे गावामध्ये राहणारे नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घाबरु नये यासाठी वन विभाग व ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गावात बैठक घेणे, साऊंड सिस्टीमवरुन आवाहन करणे आदी जागृतीचे काम करण्यात येत आहेत.
सोलापूर : कुरघोट ( ता. दक्षिण सोलापूर) गावातील भीमा नदीच्या पात्रात मगर आढळली. या मगरीपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे. नदीकाळी वन विभागाकडून कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.
कुरघोट येथे मगर आल्याचा फोटो सोशस मीडियावर वायरल झाला. त्यामुळे गावामध्ये राहणारे नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घाबरु नये यासाठी वन विभाग व ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गावात बैठक घेणे, साऊंड सिस्टीमवरुन आवाहन करणे आदी जागृतीचे काम करण्यात येत आहेत.
सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यापाण्यातून मगर आली असावी असा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला. ज्याप्रमाणे मगर आली त्याप्रमाणे ती पुन्हा जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी नदीकडे जाऊ नये असा सल्ला वन्यजीवप्रेमींनी दिला असून मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेव्याचे आवाहन करण्यात आले. आहे.
भीमा नदीचे पात्र मोठे आहे. मगर कूठून आली हे सांगता येत नाही. मगरीपासून बचाव कसा करायचा याची माहिती आम्ही गावकऱ्यांना देत आहोत. यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेत असून सुरक्षेच्या दृष्टीने वनरक्षक न मजूर तैनात केले आहेत.
- धैर्यशील पाटील, उप वनसंरक्षक, वन विभाग सोलापूर.