बनावट शिक्के, लेटर पॅड तयार केले अन सह्याही ठोकल्या, चौदा जणांवर गुन्हा दाखल
By रवींद्र देशमुख | Published: September 27, 2023 04:59 PM2023-09-27T16:59:37+5:302023-09-27T17:00:58+5:30
माजी सचिव श्यामसुंदर भिसे, भारत काळे, राजाभाऊ सुसलादे, संतोष भिसे यांच्यासह एकूण चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर /कुर्डूवाडी : माढा तालुका शिक्षण प्रसारक संस्थेच्या नावाचे शिक्के, लेटर पॅड तयार करून बनावट सह्या करून प्रोसेडिंग बुक तयार करून संस्थेच्या नावे बेकायदेशीर रक्कम स्वीकारल्याबाबत माढा न्यायालयाच्या आदेशाने कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात संस्थेचे सचिव औदुंबर पांडुरंग पाटील यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये माजी सचिव श्यामसुंदर भिसे, भारत काळे, राजाभाऊ सुसलादे, संतोष भिसे यांच्यासह एकूण चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपींनी सर्वसाधारण सभेला हजर असल्याचे दाखवून अध्यक्ष, सचिव व विश्वस्तांच्या बनावट सह्या करुन तसेच संस्थेचे सर्वसाधारण सभासद केल्याचे भासविण्यासाठी बोगस बनावट पावती बुकावर प्रत्येकी ५ हजार रूपये सभासद वर्गणी घेऊन सदरची ६५ हजार रक्कम संस्थेच्या बँकेत जमा केली नाही व त्याची कोठेही संस्थेत नोंद नाही.
संस्थेचे मूळ सर्वसाधारण सभेचे सभा इतिवृत्तांतचे प्रोसेडिंग बुक व अजेंडा बुक नसताना केवळ कुठल्यातरी वहीवर वरचेवर सर्वसाधारण सभा घेऊन त्यावर अध्यक्ष म्हणून बनावट सह्या केल्याने ते सर्वसाधारण सभेचे प्रोसेडिंग होत नाही असे असतानाही संशियत आरोपींनी जाणूनबुजून गैरमार्गाचा अवलंब करुन सदरचा प्रकार केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.