सेनेची मोर्चेबांधणी तर समविचारी एकत्र येण्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:24 AM2021-02-11T04:24:18+5:302021-02-11T04:24:18+5:30

माढा नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत १० रोजी सकाळी ११ वाजता माढा नगरपंचायत सभागृहात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी ज्योती ...

The formation of an army front and the discussion of like-minded people coming together | सेनेची मोर्चेबांधणी तर समविचारी एकत्र येण्याची चर्चा

सेनेची मोर्चेबांधणी तर समविचारी एकत्र येण्याची चर्चा

Next

माढा नगर पंचायतीच्या आरक्षणाची सोडत १० रोजी सकाळी ११ वाजता माढा नगरपंचायत सभागृहात काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, मुख्यधिकारी चरण कोल्हे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. यामध्ये प्रभाग १ सर्वसाधारण, प्रभाग २ अनुसूचित जाती, प्रभाग ३ सर्वसाधारण, प्रभाग ४ सर्वसाधारण, प्रभाग ५ ओबीसी महिला, प्रभाग ७ इतर मागास प्रवर्ग पुरुष, प्रभाग ७ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ८ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ९ ओबीसी महिला, प्रभाग १० सर्वसाधारण, प्रभाग ११ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १२ अनुसूचित जाती महिला, प्रभाग १३ ओबीसी महिला, प्रभाग १४ सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १५ नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग, प्रभाग १६ अनुसूचित जाती, प्रभाग १७ अनुसूचित महिलेस राखीव ठेवण्यात आला आहे.

मागील निवडणुकीत सर्व गटाने स्वतंत्रपणे आपली ताकद पाहिली होती. मात्र गेल्या पाच वर्षात समीकरणे बदलली आहेत. काँग्रेसपासून फरकत घेत भाजप पुरस्कृत म्हणून दादासाहेब साठे यांनी आमदारकीची निवडणूक लढविली होती. आत्ता पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मागील निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवलेले राजाभाऊ चवरे व आनंदराव कानडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. झुंजार भांगे व सुभाष जाधव, राजू गोटे हे राष्ट्रवादीत आहेत. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत शिवसेनेची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. येत्या निवडणुकीत समविचारी गट एकत्रित निवडणूक लढविणार असल्याची चार्चा सुरू आहे. त्यानुसार अनेक गोपनीय बैठका होत आहेत. आता आरक्षण जाहीर झाल्याने काही इच्छुकांचा हिरमोड तर काही जण खुश झाल्याचे पाहायला मिळाले.

Web Title: The formation of an army front and the discussion of like-minded people coming together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.