शिखर समिती स्थापन्यावरून माजी सभापती, पक्षनेत्यांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:25 AM2021-03-09T04:25:05+5:302021-03-09T04:25:05+5:30

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेली ही योजना आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. तरीही गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती. ...

Since the formation of the summit committee, there has been a rift between the former chairman and the party leaders | शिखर समिती स्थापन्यावरून माजी सभापती, पक्षनेत्यांमध्ये खडाजंगी

शिखर समिती स्थापन्यावरून माजी सभापती, पक्षनेत्यांमध्ये खडाजंगी

Next

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेली ही योजना आठ महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्यात आली. तरीही गेल्या आठ महिन्यांपासून बंद होती. योजना सुरू करण्याची जिल्हा परिषदेने १७ लाख रुपये निधीची तरतूद करून ११ फेब्रुवारी दुरुस्तीसाठी कार्यारंभ आदेश दिला. शिखर समिती स्थापन करण्यासाठी यापूर्वी तीन बैठका रद्द केल्या. आज पंचायत समितीच्या मासिक बैठकीत सदरची योजना अर्धवट असून काही गावाला पाणी मिळत नसल्यामुळे तीन महिने योजना जिल्हा परिषदेने चालवावी. मग हस्तांतरित करा, असा आग्रह माजी सभापती प्रदीप खांडेकर यांनी धरला. तर पक्षनेते नितीन पाटील यांनी ही योजना अर्धवट असून पाणी मिळत नसल्याची तक्रार संबंधित गावांच्या सरपंचांनी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करत शिखर समिती स्थापन करण्यासाठी ४० गावांतील सरपंचांना बैठकीला कशासाठी आमंत्रित केले, यावरून खडाजंगी झाली. यात काही गावचे सरपंचही बैठकीत घुसले. शेवटी शिखर समितीची बैठक रद्द करण्यात आली.

त्यानंतर उपसभापती सुरेश ढोणे यांनी पाणीपुरवठा खात्याचे उपअभियंता राजकुमार पांडव यांना सरपंचाला मिटिंगचा अजेंडा माझ्या सहीचा दिला आणि मिटिंग रद्द करायचा निर्णय परस्पर का घेतला ? असा सवाल करून त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघडणी करण्याचा प्रयत्न केला. सदर बैठक माझ्याच अध्यक्षतेखाली घ्या, असा आग्रह धरला. अन्यथा सभागृहाबाहेर जावू देणार नाही, अशी तंबीही दिली.

सध्या पंचायत समितीत चार विरुद्ध चार असे पंचायत समिती सदस्य झाले आहेत. सभापती एका बाजूला तर उपसभापती एका बाजूला, अशी अवस्था पंचायत समितीची झाल्यामुळे नागरिकांचे अनेक प्रश्न रखडलेले आहेत.

कोट :::::::::::

माझ्या सहीने अजेंडा आज काढला आहे. त्यामुळे ही मिटिंग पूर्ण झाल्याशिवाय या ठिकाणाहून आम्ही व ४० गावचे सरपंच, पंचायत समिती सभापती, सदस्य जाऊ देणार नाही.

- सुरेश ढोणे

उपसभापती

कोट ::::::::::::::::::

मी सभापती गैरहजर असल्याने उपसभापतीच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटिंग काढली होती. परंतु, सभापतींनी हजर राहून त्यांनी ही मिटिंग रद्द केली. त्यामुळे मिटिंग मी करू शकत नाही.

- राजकुमार पांडव

पाणीपुरवठा अभियंता

Web Title: Since the formation of the summit committee, there has been a rift between the former chairman and the party leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.