प्रभाग समित्यांचे गठण; आता सोलापुरातील ‘कोरोना’ रोखण्याची जबाबदारी नगरसेवकांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:08 PM2020-05-21T12:08:11+5:302020-05-21T12:31:52+5:30
सोलापूर महापालिका; उपजिल्हाधिकारी, विभागीय अधिकाºयांच्या संपर्कात राहून करायची कामे
सोलापूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याची जबाबदारी नगरसेवकांवर टाकण्यात आली आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी यासाठी नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली २६ प्रभाग समित्यांचे गठण केले आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. लॉकडाऊन तर आहेच. शिवाय प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवांवर बंधने आहेत. प्रशासनाकडून या क्षेत्रात कामे केली जात आहेत, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात नगरसेवकांना सहभागी करून घ्या, अशी मागणी सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली. त्यानुसार आयुक्तांनी शहर स्तरावर शहर समिती व प्रभागस्तरावर नगरसेवक, स्वयंसहायता बचत गट, प्रशासकीय अधिकारी यांची समिती गठीत केली आहे. या समितीने आपल्या प्रभागात विविध उपाययोजना करून घ्याव्यात, असे निर्देश देण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून काही नगरसेवक रस्त्यावर उतरुन कामे करीत आहेत. लोकांना मदत करीत आहेत, परंतु काही नगरसेवकांनी अद्याप नागरिकांना सामोरे जायची तयारी दाखवली नाही. आयुक्तांच्या निर्देशानंतर मात्र या नगरसेवकांना लोकांना सामोरे जावे लागणार आहे.
समितीने नेमके काय करायचे...!
- प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण, मास्क वाटप, व्हिटॅमीन गोळ्या वाटप करण्यासाठी मार्गदर्शन करणे, पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधण्याच्या कामात प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करणे, प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत काम करणे, खासगी डॉक्टरांच्या मदतीने ओपीडी चालू करणे, शहराबाहेरुन येणाºया नागरिकांवर आणि होम क्वारंटाईन व्यक्तींबाबत मनपा आणि पोलीस प्रशासनाला अवगत करणे, ज्येष्ठ नागरिकांची माहिती उपलब्ध करून निवारा केंद्राकडे पाठवण्याबाबत सहकार्य करणे. या कामांसाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमले आहेत. त्यांच्या संपर्कात राहूूनही कामे करावीत, असे आयुक्तांनी सुचवले आहे.
प्रभाग समितीमध्ये यांचा समावेश
- प्रभाग क्रमांक निहाय : प्रभाग क्र. १. रवी गायकवाड, २. डॉ. किरण देशमुख ३. सूर्यकांत पाटील ४. विनायक विटकर ५. गणेश पुजारी ६.गणेश वानकर ७. देवेंद्र कोठे ८. शोभा बनशेट्टी ९. नागेश वल्याळ १०. प्रथमेश कोठे ११. अनिता मगर १२. शशिकला बत्तुल १३. सुनील कामाठी १४. तौफिक हत्तुरे १५. विनोद भोसले १६. फिरदोस पटेल १७. रवी कय्यावाले १८. शिवानंद पाटील १९. श्रीनिवास करली २०. मौलाली सय्यद २१. अजहर हुंडेकरी २२. किसन जाधव २३. सुनीता रोटे २४. राजेश काळे २५. वैभव हत्तुरे २६. शिवलिंग कांबळे.