Breaking; सोलापूर बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण देशपांडे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 01:40 PM2021-05-10T13:40:21+5:302021-05-10T13:45:07+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर : उद्योजक प्रवीण विष्णुपंत देशपांडे (वय 63) यांचे अल्प आजाराने पुण्यात खासगी रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते माजी संचालक होते. सहकार, कृषी, पणन क्षेत्रातील ते नामांकित व्यक्तिमत्व होते. बालाजी उदयोग समूहच्या माध्यमातून त्यांचा अनेक कृषीपूरक वस्तू उत्पादन, विक्री व्यवसाय होता. मंद्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सभापती (कै.) गोपाळ कोरे यांच्या सहकार्याने दोनदा संपूर्ण पॅनल निवडणूक आणले होते.
दक्षिण सोलापूरच्या सीना भीमा नदीच्या खोऱ्यातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व होते. माजी आमदार दिलीप माने समर्थक अशी त्यांची ओळख होती.
6 दिवसांपूर्वी त्यांच्या सख्या भावाचे (कै.) प्रदीप देशपांडे यांचे निधन झाले होते. त्या नंतर देशपांडे परिवारास मोठा धक्का बसला. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.