माजी आमदार दिलीप माने यांचे सोलापूर महानगरपालिकेसमोर उपोषण; जाणून घ्या कारण

By Appasaheb.patil | Published: September 1, 2022 02:31 PM2022-09-01T14:31:39+5:302022-09-01T14:31:55+5:30

सोलापूर लोकमत न्यूज नेटवर्क

Former MLA Dilip Mane's hunger strike in front of Solapur Municipal Corporation; Find out why | माजी आमदार दिलीप माने यांचे सोलापूर महानगरपालिकेसमोर उपोषण; जाणून घ्या कारण

माजी आमदार दिलीप माने यांचे सोलापूर महानगरपालिकेसमोर उपोषण; जाणून घ्या कारण

Next

सोलापूरसोलापूर शहरातील रस्ते डांबरीकरण व साेरेगांव येथील शेतकऱ्यांच्या मलनिस्ररणपाणी प्रश्न तसेच नुकसान ग्रस्त शेतकर्‍यांना शासकीय मदत मिळण्याच्या मागणीसाठी सोलापूर महापालिकेसमाेर माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार १ सप्टेंबर ्२०२२ रोजी उपोषण सुरू करण्यात आले. .

उत्तर सोलापूर तालुक्यातील सोरेगाव इथल्या मलनिस्सारण केंद्राचे पाणी नदीत सोडावे, या केंद्राच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाची मदत मिळवून द्यावी तसेच सोलापूर शहरातील आसरा चौक, डी मार्ट रस्ता, सात रस्ता, महावीर चौक, अशोक चौक, मार्केट यार्ड, छत्रपती शिवाजी चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, सिद्धेश्वर प्रशाला या भागात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी या उपोषणातून करण्यात आली आहे. दरम्यान उपोषण स्थळी महापालिकेचे नगर अभियंता संदीप कारंजे यांनी उपोषण स्थळी येऊन दिलीप माने यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनात पृथ्वीराज माने युवा मंचचे कार्यकर्ते, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील दिलीप माने यांचे समर्थकांची मोठी हजेरी होती. मागील काही दिवसांपूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनी रस्त्याची दुूरूस्ती करा अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला होता. 

Web Title: Former MLA Dilip Mane's hunger strike in front of Solapur Municipal Corporation; Find out why

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.