अनगरच्या आरोग्य केंद्रात घेतली माजी आमदार राजन पाटील यांनी सपत्नीक कोरोनाची लस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 10:07 PM2021-03-15T22:07:58+5:302021-03-15T22:08:30+5:30

नागरिकांनी कोणतेही शंका व भिती न बाळगता कोरोनाची लस घ्यावी - माजी आमदार राजन पाटील

Former MLA Rajan Patil vaccinated his wife Corona at Angar Health Center | अनगरच्या आरोग्य केंद्रात घेतली माजी आमदार राजन पाटील यांनी सपत्नीक कोरोनाची लस 

अनगरच्या आरोग्य केंद्रात घेतली माजी आमदार राजन पाटील यांनी सपत्नीक कोरोनाची लस 

googlenewsNext

अनगर : सत्यवान दाढे


मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजन पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी राजश्री राजन पाटील यांनी अनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (कोविशिल्ड ) ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आरोग्य केंद्राच्या सिस्टर गुडे यांनी त्यांना ही लस दिली. यावेळी नागरिकांनी  कोणतेही शंका व भिती मनात न ठेवता कोरोना लस घ्यावी. मी लस घेतली मला कोणताही त्रास झालेला नाही. तेव्हा ही लस घेण्यास पात्र असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस घेऊन कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन यानिमित्ताने माजी आमदार राजन पाटील यांनी केले.


यावेळी कोरोना काळात उत्तम कामगिरी केलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ. मुल्ला, डाॅ. संतोष गुजरे व प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेल्या कामाचे पाटील यांनी काैतुक केले. याप्रसंगी वैद्यकिय अधिकारी डाॅ. मुल्ला डाॅ. संतोष गुजरे, डाॅ. सुहास कादे, डाॅ. पाथ्रुडकर, गुडे मॅडम, राम कदम, नारायण गुंड यांच्यासह आरोग्य केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: Former MLA Rajan Patil vaccinated his wife Corona at Angar Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.