माजी सभापती गोपाळराव कोरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:15+5:302021-02-13T04:22:15+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव आप्पाराव कोरे (वय ७६) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव आप्पाराव कोरे (वय ७६) यांचे शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता हृदयविकाराने निधन झाले. शनिवारी दुपारी एक वाजता त्यांच्यावर मंद्रुप येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोपाळराव कोरे यांना तीन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात माजी सभापती आप्पाराव कोरे यांच्यासह चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहेत.
मंद्रुपच्या राजकारणात कोरे घराण्याचा दबदबा आहे. गोपाळराव कोरे यांनी मंद्रुपचे अनेक वर्षे सरपंचपद भूषवले आहे. पंचायत समितीचे सभापती, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषदेचे सदस्य आधी पदावर त्यांनी काम केले आहे. १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे ते कट्टर समर्थक होते. अबोल आणि निगर्वी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची तालुक्याला ओळख होती. मंद्रुप परिसरातील राजकारणाचे सूत्रधार म्हणून गोपाळराव कोरे यांनी भूमिका बजावली आहे.