आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हायरल करून माजी जिल्हा परिषद बाळासाहेब माळी बेपत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:05 PM2023-05-16T12:05:45+5:302023-05-16T12:05:59+5:30
पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे.
सोलापूर / करकंब : मला व माझ्या पत्नीला फसविले आहे मी यातून सावरू शकत नाही. त्यामुळे मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियावर 15 मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हायरल करून भोसे जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य आणि दत्तकृपा पेट्रोल पंपाचे मालक बाळासाहेब राजाराम माळी झाले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांचा दत्तकृपा पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपावर मॅनेजर म्हणून पंढरपूर येथील तानाजी कोळी आणि बाळासाहेब माळी यांचे पुतणे प्रदीप माळी हे कामकाज पाहत होते. या दोघांनी आर्थिक व्यवहारांमध्ये मोठा घोटाळा करत एक कोटी एकवीस लाखांचा अपहार केला असल्याची सुसाईड नोट बाळासाहेब माळी यांनी सोमवार (दि. १५) रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हाट्सअप ग्रुपवर टाकली. तानाजी कोळी यांनी केलेल्या आर्थिक फसवणुकीला आणि दमबाजीला कंटाळून मी कुटुंबासह आत्महत्या करीत आहे, मी खूप लांब आलो आहे, मला शोधण्याचा प्रयत्न करू नये, असा मेसेज असा संदेश व्हाट्सअप ग्रुपवर टाकून ते आपल्या परिवारासह बेपत्ता झाले आहेत.