पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:24 AM2021-08-23T04:24:42+5:302021-08-23T04:24:42+5:30

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ...

Forty five thousand tons of agricultural goods were transported by Kisan Railway | पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

पंचेचाळीस हजार टन शेतमाल वाहतुकीतून किसान रेल्वे झाली मालामाल

Next

सांगोला रेल्वे स्थानकातून गतवर्षी २१ ऑगस्ट, २०२० रोजी किसान रेल्वेचा शुभारंभ झाला. सांगोला स्थानकातून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, शालिमार या ठिकाणी किसान रेल्वे सुरू केल्यामुळे सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षे, खरबूज उत्पादक शेतकऱ्यांची मोठी सोय झाली. यापूर्वी शेतकऱ्यांच्या उत्पादित डाळिंब, द्राक्ष, सिमला मिरची ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून वाहतूक केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल मार्केटला पोहोचण्यास विलंब लागत होता. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल नाशवंत होण्याबरोबरच दराचा फटका बसत होता. मात्र, किसान रेल्वेमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय दूर झाली आहे.

अशी झाली शेतमालाची वाहतूक

ऑगस्ट, २०२० मध्ये १७,४८७ बॉक्समधून २११ टन वाहतूक (९ लाख ६८ हजार ७१९ रुपये), सप्टेंबरमध्ये ९२ हजार ५६० बॉक्समधून १,२१४ टन (५५ लाख ९४ हजार ९७ रुपये), ऑक्टोबरमध्ये २ लाख ६८ हजार ८७५ बॉक्समधून ३,२४७ टन (१ कोटी ५४ लाख ८४ हजार ५१९ रुपये), नोव्हेंबरमध्ये २ लाख २६ हजार ५८० बॉक्समधून २,७१० टन (१ कोटी २६ लाख ९१ हजार ३९८ रुपये), डिसेंबरमध्ये १ लाख ६६ हजार ८८७ बॉक्समधून २१,११ टन (९९ लाख ९२ हजार ४१२ रुपये), जानेवारी, २०२१ मध्ये १ लाख ८५ हजार १७१ बॉक्समधून २,१८१ टन (१ कोटी ६ लाख ९१ हजार २१० रुपये), फेब्रुवारीमध्ये ४ लाख ३३ हजार ४४७ बॉक्समधून ५,२५७ टन (२ कोटी ४९ लाख ३२८ रुपये), मार्चमध्ये ४ लाख ८७ हजार ९३३ बॉक्समधून ५,८३४ टन (२ कोटी ७३ लाख ८६ हजार ८१८ रुपये), एप्रिलमध्ये ३ लाख ७३ हजार ६४९ बॉक्समधून ४,५८२ टन (२ कोटी १३ लाख १ हजार ३१० रुपये), मेमध्ये २ लाख ८५ हजार ४५० बॉक्समधून ३,५६१ टन (१ कोटी ६५ लाख ६३ हजार ३१ रुपये), जूनमध्ये ३ लाख ९२ हजार २९७ बॉक्समधून ४,८६५ टन (२ कोटी २७ लाख ४२ हजार ६६९ रुपये), जुलैमध्ये ४ लाख २३ हजार ७१७ बॉक्समधून ५,४६५ टन (२ कोटी ५५ लाख ७१ हजार १४३ रुपये), २० ऑगस्टअखेर ३ लाख ७ हजार ९२४ बॉक्समधून ४,३२० टन (१ कोटी ९९ लाख १ हजार ५६८ रुपये) असे वर्षभरात ४५ हजार ५५८ टन शेतीमाल वाहतुकीतून रेल्वेला सुमारे २१ कोटी ३७ लाख ८९ हजार २२२ रुपये उत्पन्न मिळाल्याचे स्टेशन मास्तर एस.एन. सिंग यांनी सांगितले.

कोट :::::::::::::::::::

शेतकऱ्यांकडून किसान रेल्वेच्या माध्यमातून डाळिंब, द्राक्ष, केळी, सिमला मिरचीसह शेतीमाल वाहतुकीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगली, सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब, द्राक्षांना दिल्ली, कोलकाता, बिहारच्या बाजारपेठेत मोठी मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. सध्या किसान रेल्वे पूर्ण क्षमतेने सुरू असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आणखी फेऱ्या वाढ

Web Title: Forty five thousand tons of agricultural goods were transported by Kisan Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.