मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळून आले तर तळघर; फरशी काढताच आढळली पोकळी 

By Appasaheb.patil | Published: May 31, 2024 02:29 PM2024-05-31T14:29:49+5:302024-05-31T14:31:46+5:30

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पदलवार यांनी मंदिरात तळघर आढळून आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिले आहे.

found in vitthal temple of pandharpur a cavity was found when the floor was removed  | मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळून आले तर तळघर; फरशी काढताच आढळली पोकळी 

मोठी बातमी! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आढळून आले तर तळघर; फरशी काढताच आढळली पोकळी 

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन व संवर्धनाचे काम चालू असताना पुरातन विभागाच्या कर्मचाऱ्यांना विठ्ठल मंदिरात तळघर आढळून आले आहे. यामुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पदलवार यांनी मंदिरात तळघर आढळून आल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिले आहे.

सध्या श्री. विठ्ठल रूक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचे व जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. मंदिर संवर्धन व जिर्णोद्वार आराखड्यातील प्रस्तावित कामांपैकी बाजीराव पडसाळी, गर्भगृह, सोळखांबी, सभामंडप व इतर ठिकाणी काम सुरू आहे. त्याचबरोबर चांदी हे बसवण्यात येणार आहे. जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे आपणा सर्वांना माहिती आहे. १५ मार्चपासून गाभार्‍यात जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू केलेल्या आहेत. तेव्हापासून पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आले होते. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. २ जून पासून पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू करण्यात येत आहे. 

गुरुवारी सोळखांबी परिसरात पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी हनुमान दरवाजाजवळ काम करत होते. त्यावेळी  फरशीचा चूना निघाला आहे. म्हणून त्या ठिकाणी क्लिनिंग करत असताना एक दगड खचला. व त्या ठिकाणी पोकळी आढळून आली. तो दगड काढल्यानंतर त्या ठिकाणी एक तळघर मिळून आले आहे. तत्काळ मंदिर समितीतील अधिकारी व वास्तु विशारद आबबळे यांनी पाहणी केले. त्यावेळी ते तळघर पाच ते दहा फूट असल्याचे दिसून आले. तळगारात काही मूर्ती असल्याचे नाकारता येत नाही. पंढरपुरातील महाराज मंडळी, अभ्यासक यांच्याकडून तळघराच्या इतिहासाविषयी माहिती शोधण्याचे काम सुरू आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष पंढरपुरात पोहोचल्यानंतर तळघराचे पाहणे करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.

Web Title: found in vitthal temple of pandharpur a cavity was found when the floor was removed 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.